आटोक्यात ठेवा हिमोग्लोबिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:55 AM2018-03-30T01:55:21+5:302018-03-30T01:55:21+5:30
रक्तामधील लोह वाहून नेण्याचे कार्य प्रथिने करतात. त्याला हिम असे म्हणतात. हेच लोह फुफ्फुसापर्यंत आणण्याचं काम ही प्रथिने करतात.
स्वाती पारधी
रक्तामधील लोह वाहून नेण्याचे कार्य प्रथिने करतात. त्याला हिम असे म्हणतात. हेच लोह फुफ्फुसापर्यंत आणण्याचं काम ही प्रथिने करतात. रक्तामधील हिमोग्लोबिनची मात्रा आपले जीवन सुव्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते. रक्तामधील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे दैनंदिन आहारातून मिळणाऱ्या लोहाचे शोषण न झाल्यामुळे शरीरात विविध घडामोडी होत असतात. उदा. अतिप्रमाणात चहा, कॉफी, टॉनिक किंवा टॉनिकयुक्त पदार्थ लोहाचं अब्झॉर्शन होऊ देत नाहीत. म्हणूनच लोहयुक्त पदार्थांचे सेवन करताना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागतात. काही गोष्टींचा समावेश आहारात जाणीवपूर्वक करणे अत्यंत आवश्यक असते.
नियमित तपासणी आवश्यक हिमोग्लोबिन कमी असल्याचे काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध सुरू करणे. तसेच नियमितपणे तपासणी करत राहाणे योग्य ठरते. साधारणत: प्रौढांमध्ये १३.५ ते १७ ॅ१/ऊछ तर स्त्रियांच्या रक्तामधील १२ ते १५ ॅ१/ऊछ एवढं असणे आवश्यक असते.
हिमोग्लोबिन हा रक्तामधील आवश्यक घटक असून, हा लोह आणि प्रथिने यापासून तयार झालेला असतो. आजकाल होणाºया न्यूट्रियन्टच्या कमतरतेमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होताना दिसते. मुख्यत: हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाल्याने अनेमियासारख्या अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्याचे मुख्य कारण रक्तामधील लोहाची कमतरता.
हिमोग्लोबिन कमी होण्याची प्रमुख कारणे
१) अतिरक्तस्त्राव झाल्याने, उदा. अपघात किंवा शस्त्रक्रियेवेळी होणारा रक्तस्त्राव, मूळव्याध किंवा आतड्यांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सरमुळे होणारा रक्तस्त्राव.
२) अयोग्य पद्धतीच्या आहारामुळे.
३) अत्यावश्यक न्युट्रियन्टच्या कमतरतेमुळे.
४) आहारातील लोह तसेच व्हिटॉमिन बी-१२ व फॉलिक आॅसिड तसेच व्हिटॅमिन सीच्या अती कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण मुख्यत: कमी होते.
हिमोग्लाबिनचे प्रमाण सर्वसाधारण प्रमाणापेक्षा कमी असल्यास पुढील गोष्टी घडून येऊ शकतात.
१) अनेमिया हा विकार होतो व याचे खूप प्रकार असतात. लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले, तरुण मुली, गर्भवती स्त्रिया, वृद्ध यामध्ये अनेमियाचे प्रमाण सर्वात जास्त आढळते.
२) पांढरी त्वचा किंवा निस्तेज त्वचा हासुद्धा एक प्रकार प्रामुख्याने आढळतो.
३) अशक्तपणाही खूप आढळतो.
४) चक्कर येणे, छातीत दुखणे.
५) स्मृतिभ्रंश यासारखे प्रकार आढळतात.
दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक आहार
दैनंदिन आहारातून आपणांस कोणत्याही एका फूड सोर्समधून हिमोग्लोबिन वाढवता येत नाही. त्यासाठी दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात पालक, ब्रोकोली, लाल भोपळा, इतर फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स, सफरचंद, डार्क चॉकलेट, पालेभाज्या, ब्राऊन राईस, फ्लॅक्स सीड्स इत्यादींचा समावेश केल्याने नक्कीच हिमोग्लोबीन नियंत्रणात ठेवता येते किंवा त्याचे संतुलन राखणे शक्य होते.
(लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.)
swatipardhi23@gmail.com