टूथब्रशने स्वच्छ ठेवा फुप्फुसं, निमोनिया येणार नाही जवळ; स्वत उपायाने वैज्ञानिकही अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 04:13 PM2023-12-22T16:13:16+5:302023-12-22T16:14:22+5:30
इतकंच नाहीतर याने निमोनियासारख्या आजारापासूनही बचाव करता येतो. या खुलाशानंतर वैज्ञानिकही अवाक् झाले आहेत.
बॅक्टेरिया आणि व्हायरससारखे माइक्रोब्स फुप्फुसांना खराब करतात. यावर लोक वेगवेगळे उपाय करतात. पण तुम्ही विचार केलाय का की, फुप्फुसे साफ करण्यासाठी तुमचा टूथब्रशही तुमच्या कामी येऊ शकतो. इतकंच नाहीतर याने निमोनियासारख्या आजारापासूनही बचाव करता येतो. या खुलाशानंतर वैज्ञानिकही अवाक् झाले आहेत.
काय सांगतो रिसर्च?
JAMA मध्ये एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. ज्यात 2700 रूग्णांवर अभ्यास करण्यात आला. यात आढळून आलं की, जे लोक रोज आपल्या तोडांची स्वच्छता करतात, त्यांना हॉस्पिटल एक्वायर्ड निमोनियाचा धोका त्या लोकांपेक्षा कमी होता, जे तोडांच्या स्वच्छतेकडे फार लक्ष देत नाहीत.
टूथब्रशने कसे साफ कराल फुप्फुसं?
फुप्फुसांना खराब करणारे जास्तीत जास्त व्हायरस, बॅक्टेरिया हे तोंडावाटे शरीरात जातात. जर तुम्ही तोंडाच्या स्वच्छतेवर चांगलं लक्ष दिलं तर हे फुप्फुसात जाण्यापासून रोखले जाऊ शकतात. ज्यामुळे फुप्फुसांपर्यंत बॅक्टेरिया किंवा व्हायरस जाऊ शकणार नाही.
द हार्वर्ड गॅजेटच्या रिपोर्टमध्ये संक्रमण रोग विशेषज्ञ Michael Klompas यानी सांगितलं की, हेल्थ विश्वासासाठी हे फारच आश्चर्यजनक आहे की, अशा सोप्या आणि प्रभावी उपायाने निमोनियासारख्या गंभीर इन्फेक्शनपासून बचाव करता येतो.
हॉस्पिटल एक्वायर्ड निमोनिया म्हणजे काय?
हॉस्पिटल एक्वायर्ड निमोनिया किंवा नोसोकोमियल निमोनिया असा प्रकार असतो जो हॉस्पिटलमध्ये भरती करताना होत नाही. पण 48 तासांच्या आता फुप्फुसांना पकडतो आणि नंतर गंभीर होतो. हा एखाद्या आजाराच्या उपचारादरम्यान होऊ शकतो आणि एका साइड इफेक्टसारखा दिसतो.
या निमोनियाची लक्षणं
हिरवा कफ असलेला खोकला, ताप, थंडी वाजणे, अस्वस्थता, भूक कमी लागणे, मळमळ होणे, उलटी, छातीत रूतणारी वेदना, श्वास भरून येणे, ब्लड प्रेशर कम होणे, जोरजोरात श्वास घेणे.
अशी करा तोंडाची स्वच्छता
इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी पूर्ण तोंडाची चांगली स्वच्छता करावी. यासाठी आधी टूथब्रश प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. नंतर फ्लॉसने दातांची स्वच्छता करा. टंग क्लीनरने जीभ स्वच्छ करा आणि नंतर माउथवॉशने तोंड स्वच्छ करा.