हृदयविकाराचा धोका टाळायचाय तर शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवा, 'अशापद्धतीने'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 05:09 PM2022-07-17T17:09:16+5:302022-07-17T17:29:39+5:30
जाणून घेऊया चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी काय करायला हवे.
कोलेस्ट्रॉलविषयी जेव्हा कधी चर्चा होते, तेव्हा पहिल्यांदा आपल्या डोक्यात खराब कोलेस्ट्रॉलचा विषय येतो. खराब कोलेस्ट्रॉल वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज असते. पण, आपल्या शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल देखील असते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्याला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (High Density Lipoprotein) म्हणजेच एचडीएल म्हणतात.
कोणत्याही प्रकारच्या हृदयविकारांपासून यामुळे आपले संरक्षण करण्याचे काम होते. जर तुम्ही पुरुष असाल तर तुमचे एचडीएल 40 पेक्षा जास्त असले पाहिजे तर महिलांसाठी ते 50 पेक्षा जास्त असावे. परंतु एचडीएल यापेक्षा कमी असल्यास रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. हृदयरोग टाळण्यासाठी, तुमचे एचडीएल किमान 60 असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी काय करायला हवे.
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे उपाय
सक्रीय रहा - तुम्ही जितके जास्त सक्रिय असाल तितके तुमच्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल चांगले राहील. यासाठी तुम्ही दररोज किमान अर्धा तास व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग, योगा, सायकलिंग इत्यादी करू शकता.
वजन नियंत्रणात हवे - तुम्ही जितके वजन नियंत्रित कराल तितके तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि चांगले कोलेस्ट्रॉल आपोआप सुधारेल.
निरोगी चरबी सेवन - चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारात काही निरोगी चरबीच्या पदार्थांचा समावेश करू शकता. यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड समृद्ध अन्न म्हणजे मासे, अक्रोड, ब्रोकोली इत्यादींचा आहारात समावेश करावा.
दारूवर नियंत्रण - योग्य प्रमाणात अल्कोहोल घेत असाल तर तुमचे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
धूम्रपान नको- धूम्रपान करत असाल तर धूम्रपान केल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढण्यास मदत होते, ज्यामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलचे नुकसान होते.
फायबर मिळणारे पदार्थ-तुमच्या आहारात फळे, भाज्या, धान्ये इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचा अधिकाधिक समावेश करा. ते तुमचे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात.