तुमचं हसू कायम ठेवा, दाताच्या फटी आता भरतील घरगुती उपायांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:37 PM2021-07-14T17:37:07+5:302021-07-14T17:37:39+5:30

काहींच्या गोड चेहऱ्याला त्यांचे दात अजिबात शोभणारे नसतात. काहींच्या दातामध्ये मोठ्या फटी असतात. या फटी तुम्ही घरच्या घरी उपाय करून मिटवू शकता.

Keep your smile, toothpaste will now be filled with home remedies | तुमचं हसू कायम ठेवा, दाताच्या फटी आता भरतील घरगुती उपायांनी

तुमचं हसू कायम ठेवा, दाताच्या फटी आता भरतील घरगुती उपायांनी

Next

तुमचा चेहरा आकर्षक असेल तर तुमच्याकडे मागे वळून वळून लोकं पाहतात. तुमच्या चेहऱ्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावरील गोड हसू ते पाहत असतात.आता तुम्ही हसणार म्हटल्यावर तुमचे दात तर दिसणारच ना? पण काहींच्या गोड चेहऱ्याला त्यांचे दात अजिबात शोभणारे नसतात. काहींच्या दातामध्ये मोठ्या फटी असतात. या फटी तुम्ही घरच्या घरी उपाय करून मिटवू शकता.

डेंटल इम्प्रेशन किट
डेंटल इप्रेशन किटचा उपयोग करून तुम्ही तुमच्या दातामधील गॅप कमी करू शकता. यासाठी त्या किटमध्ये साहित्य दिलेले असेल व ते कसे वापरायचे याची माहिती दिलेली असेल. डायस्टेमाची समस्या दूर करण्यासाठी हा चांगला उपाय आहे. अनेकांचे दात वाकडेतिकडे असतात त्या समस्येवरही याने आराम मिळतो.

डेंटल बाँडिंग
दातांमधील गॅप कमी करण्यासाठी डेंटल बाँडिंगचा खुप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. यात रेसिनचा उपयोग केला जातो. विशिष्ट लाईट वापरून ते कठीण केले जाते. तुम्ही याचा वापर करण्यापुर्वी डेंटिस्टचा सल्ला घेऊ शकता.


रिटेनर्स
दातांच्या गॅपची समस्या किंवा डायस्टेमाला दूर करण्यासाठी रिटेनर्सचा उपयोग केला जाऊ शकतो. रिटेनर्सचा उपयोग तेव्हा लाभदायक असतो जेव्हा तुमच्या दातांमधील गॅप कमी असतो. यात दातांवर दबाव टाकुन त्यांची शिफ्टिंग केली जाते. यासाठी तुम्ही डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकता.

डेंटल एलिगनर्स
डेंटल एलिगनर्सचा उपयोग करून तुम्ही तुमच्या दातांमधील गॅप भरु शकता. डेंटल एलिगनर्स दातांच्या फटी भरण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो.


 

Web Title: Keep your smile, toothpaste will now be filled with home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.