आनंदी व्हायला पैसे थोडीच लागतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:01 PM2017-07-31T15:01:24+5:302017-07-31T15:04:04+5:30

करुन पाहा हे सोप्पे आठ उपाय आणि घ्या जीवनाचा आनंद नव्यानं.

Keep yourself happy by keeping negative thoughts aside | आनंदी व्हायला पैसे थोडीच लागतात?

आनंदी व्हायला पैसे थोडीच लागतात?

Next
ठळक मुद्देसकारात्मक विचाराच्या लोकांसोबत राहा.इतरांना मदत करा.स्वत:तल्या चांगल्या गोष्टी शोधा.कोणतीही जबाबदारी घ्या आणि ती तडीस न्या.

- मयूर पठाडे

आपल्या आजूबाजूचं वातावरणच बºयाचदा असं असतं की, नकारात्मक विचारांनी आपलं मन पूर्णत: व्यापलेलं असतं. नेहमी हसत राहा, प्रसन्न राहा, काळजी करू नका.. त्यानं तुमच्या वर्तमानात काहीही फरक पडणार नाही.. आता हे काही आपल्याला माहीत नाही असं नाही. पण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक ताणांना आपल्याला सामोरं जावं लागतं, अशावेळी नकारात्मक विचारांपासून दूर राहावं तरी कसं?..
अनेकांना हा प्रश्न पडतो, पण लक्षात ठेवा त्यावरही उपाय आहेत. नकारात्मक विचारांनी काहीच होणार नाही, झालंच तर आपलं टेन्शन आणि डोकेदुखी तेवढी वाढेल, हे तुम्हालाही माहीत आहे.. मग करुन पाहा या गोष्टी. त्यानं तुमचं टेन्शनही कमी होईल आणि नकारात्मक गोष्टीही दूर पळतील.

कसे घालवाल नकारात्मक विचार?
१- सकात्मक विचारांच्या, कायम प्रफुल्लित दिसणाºया लोकांच्या, तशाच प्रकारच्या आपल्या मित्रमंडळींसमवेत, कुटुंबियांसमवेत राहाण्याचा प्रयत्न करा. त्यांची सकारत्मकता तुम्हालाही प्रफुल्लित करील
२- ध्यानधारणा किवा योगाचा आधार घ्या. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि मुख्य म्हणजे वर्तमानात राहायला त्यामुळे मदत होईल.
३- ताणातही हसणं, हसत राहाणं अवघड आहे, असं कोणीही म्हणेल, पण करुन तर पाहा, अगदी आर्टिफिशिअल हसण्यानंही फायदा होतो हे संशोधनांतून सिद्ध झालं आहे.
४- नकारात्मक विचार आपल्याला गाठणार नाहीत, यासाठी कायम सकारात्मक गोष्टींचा विचार करा. तरीही नकारात्मक विचार येतीलच, पण त्यांचं प्रमाण खूपच कमी होईल एवढं नक्की.
५- कुठल्याही गोष्टीची स्वत:हून जबाबदारी घ्या. एकदा का अशी जबाबदारी घेतली की ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण स्वत:हून करतो. त्यात गुंतल्यामुळे इतर गोष्टींवरचा, नकारात्मक वेळ आपोआपच दूर जातो.
६- अगदी काहीच नाही, तर इतरांना मदत करा. कोणत्याही गोष्टीत. घरी आईला, बायकोला, बहिणीला, रस्त्यावरच्या कुणा गरजूला, आॅफिसात.. ही मदत किती का किरकोळ असेना, पण ती नक्की तुमच्या मनांत आनंदी विचारांची रुजवात करील.
७- आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगातला कोणताच माणूस परफेक्ट नाही. कोणालाही कोणत्याही भावभावना आणि नकारात्मकता चुकलेली नाही. प्रत्येकालाच त्या चक्रातून जावं लागतं. त्यामुळे त्याचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही. खांदे झटका आणि पुन्हा कामाला लागा. बघा, काय फरक पडतो ते.
८- भले नकारात्मक विचारांनी तुम्ही भारलेले असाल, पण एक गोष्ट करा, आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत त्याचाही एकदा विचार करा. थेट लिहूनच काढा ना ते.. तुमच्या लक्षात येईल, रडत, कुढत बसण्यापेक्षा करायच्या अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत.

Web Title: Keep yourself happy by keeping negative thoughts aside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.