Coronavirus चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर द्या अधिक लक्ष, रिसर्चमधून दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:00 AM2021-04-22T10:00:52+5:302021-04-22T10:01:20+5:30
Coronavirus : याचे पुरावे सापडले आहे की, तोंड स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध माउथवॉश Covid-19 साठी जबाबदार सार्स-सीओवी-२ ला निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी आहे.
जर कोरोनापासून (Coronavrus) बचाव करायचा असेल तर तोंडाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या वैज्ञानिकांनी सांगितले की, व्हायरल तोंडातून फुप्फुसापर्यंत पोहोचण्याचा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेसारखा साधारण उपाय फार फायदेशीर ठरू शकतो. असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. जर्नल ऑफ ओरल मेडिसिन अॅन्ड डेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, याचे पुरावे सापडले आहे की, तोंड स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध माउथवॉश (Mouthwash) Covid-19 साठी जबाबदार सार्स-सीओवी-२ ला निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी आहे.
...म्हणून गरजेची आहे स्वच्छता
रिसर्च दरम्यान वैज्ञानिकांनी आढळून आले की, कोरोना व्हायरस लाळेच्या माध्यमातून फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो. जर तुम्हाला हिरड्यांची काही समस्या असेल तर यात व्हायरस थेट तोंडातून रक्तप्रवाहात पोहोचतो. वैज्ञानिकांनुसार, पुराव्यातून समजून येतं की, फुप्फुसाच्या रक्तवाहिन्या सुरूवातीला COVID-19 फुप्फुसाच्या आजाराने प्रभावित होते. आणि लाळेत व्हायरसचं प्रमाण अधिक राहतं. दातांच्या आजूबाजूला सूज असेल तर मृत्युचा धोका वाढतो. त्यामुळे दातांची आणि तोंडाची स्वच्छता महत्वाची ठरते. (हे पण वाचा : coronavirus: कोरोनावरील उपचारातील या घरगुती उपायांमुळे अजून वाढतो धोका, डॉक्टरांनी दिला असा इशारा)
धोका कसा टाळाल?
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, दातांवर जमा झालेला अन्न कणांचा थर आणि हिरड्यांच्या आजूबाजूला सूज आल्याने सार्स-सीओवी-२ व्हायरस फुप्फुसात पोहोचण्याचा आणि जास्त गंभीर संक्रमण करण्याची शक्यता जास्त वाढते. तज्ज्ञ सांगतात की, तोंडाची स्वच्छता एक चांगला जीवन रक्षक उपाय होऊ शकतो.
Mouthwash नसेल तर मिठाचं पाणीही चालेल
ब्रिटनच्या बर्मिंघम विश्वविद्यालयातील प्रोफेसर आणि या रिसर्चचे सह-लेखक इयान चॅपल म्हणाले की, या मॉडलने आपल्याला हे समजून घेण्यास मदत मिळू शकते की, का काही लोकांना Covid-19 ने फुप्फुसांचा आजार होतो आणि काही लोकांना होत नाही. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, दातांना काळजीपूर्वक ब्रशने स्वच्छ करा. दातांमधील घाण स्वच्छ करा. माउथवॉशचा वापर करून किंवा मिठाच्या पाण्याने गुरळा करून तुम्ही हिरड्यांवरील सूज कमी करू शकता. ज्याने लाळेतील व्हायरसची सांद्रता कमी करण्यास मदत मिळू शकते.