किटो डाएटने एका आठवड्यात कमी करु शकता ३ ते ४ किलो वजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 10:37 AM2018-12-14T10:37:07+5:302018-12-14T10:38:47+5:30
सध्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट समोर येत आहेत. लोकही वाढलेल्या वजनाला वैतागलेले असल्याने फिट राहण्यासाठी या डाएटचा आधार घेत आहेत.
(Image Credit : www.abctoday.ca)
सध्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएट समोर येत आहेत. लोकही वाढलेल्या वजनाला वैतागलेले असल्याने फिट राहण्यासाठी या डाएटचा आधार घेत आहेत. आता केटोजेनिक डाएट वजन कमी करण्यासाठी फार चांगला पर्याय असल्याचं बोललं जात आहे. या डाएटला सामान्य भाषेत किटो डाएट म्हटलं जातं. मात्र किटो डाएट ही एक मेडिकल डाएट असून ही डाएट एखाद्या एक्सपर्टच्या देखरेखीत फॉलो केली गेली पाहिजे. जेणेकरुन कोणतीही आरोग्यदायी समस्या होऊ नये.
बॉडी मसल्सही होतात मजबूत
काही दिवसांपूर्वीच किटो डाएटची जोरदार चर्चा रंगली होती. कारण रणवीर सिंगने त्याच्या लग्नाच्या एक आठवड्यापूर्वी किटो डाएट सुरु केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्याने हा डाएट प्लॅन फॉलो करुन ७ दिवसात ३ ते ४ किलो वजन कमी केलं होतं. किटो डाएटमुळे वजन तर कमी होतच, सोबतच बॉडी मसल्सही मजबूत होतात. चला जाणून घेऊ काय आहे किटो डाएट...
काय आहे किटो डाएट?
किटो डाएट करुन शरीराला किटोसिस स्थितीमध्ये आणलं जातं. किटोसिस ही शरीराची एक मेटाबॉलिक स्थिती आहे. ज्यात शरीर फॅटचा वापर ऊर्जेच्या रुपात करतं. त्यामुळेच हा डाएट प्लॅन फॉलो शरीराची गरज, उंची आणि वजन यानुसार प्लॅन केला जातो. या स्थितीत शरीर ब्लड ग्लूकोजऐवजी फॅटचे तुकडे तोडून ऊर्जेच्या रुपात वापरतं. याने वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते.
किटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं दररोज २० ते ५० ग्रॅम सेवन करावं लागतं. म्हणजे या डाएटमध्ये कमी कार्बोहायड्रेट आणि जास्त हाय फॅट पदार्थांचं सेवन केलं जातं. मात्र जेव्ह आपण फार जास्त कोर्बोहायड्रेट असलेले पदार्थ खातो तेव्हा शरीरात ग्लूकोज तयार होतं. ग्लूकोजला शरीरा सहजपणे ऊर्जेत रुपांतरित करतं.
पण किटोजेनिक डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं जातं. ज्यामुळे शरीरात किटोसिसची स्थिती निर्माण होते. किटोसिस एक अशी स्थिती आहे, ज्यात जेवण कमी केल्यानंतरही आपल्याला जिवंत ठेवण्यास मदत मिळते. ज्यात शरीर ग्लूकोजऐवजी फॅटचा ऊर्जेसाठी वापर करतं.
हाय फॅट डाएट
लो कार्ब आणि हाय फॅट डाएट हाच किटो डाएटचा मुख्य आधार असतो. पण हा डाएट प्लॅन आणखी प्रभावी करण्यासाठी यासोबत काही ड्रिंक्स घेण्याची गरज आहे. याने तुम्ही तुमचं शेड्युल योग्यप्रकारे प्लॅन करु शकता.
बॉडी डिटॉक्स
लिंबू आणि मिंटचा ज्यूस तुमच्या वजन कमी करण्याच्या प्लॅनचा महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यामुळे रोज सकाळी हा ज्यूस आवर्जूज घ्यावा. याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत मिळते. म्हणजे शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात. याने तुमचा वजन कमी करण्याचा प्लॅनही वेगाने काम करु लागतो.
पालक-टोमॅटोची स्मूदी
पालक उकळून घ्या. नंतर ती मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये टोमॅटो टाकून बारीक करा. ही स्मूदी वजन करण्यास मदत करते. सोबतच याने तुमचं पोट साफ होण्यासही मदत मिळते.
फॅट क्रिम मिल्क
तुमचा डाएट प्लॅन हाय फॅट आणि लो कार्बची असेल तर तुम्ही फूल फॅट क्रिम असलेलं दूध सेवन करावं. सकाळी आणि सायंकाळी या दुधाचा समावेश डाएटमध्ये करावा. हवं असेल तर तुम्ही दुधाची स्मूदीही तयार करु शकता. यात तुम्ही रेड बेरीजही टाकू शकता. तसेच दुधात बदाम टाकूनही सेवन करु शकता.