आश्चर्य! २ इंच कापूनही वाढतच आहे जिभेचा आकार, 'या' दुर्मीळ समस्येचा करतोय हा मुलगा सामना...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 01:05 PM2021-02-12T13:05:12+5:302021-02-12T13:12:57+5:30
ओवेनचा जन्म ७ फेब्रुवारी २०१८ ला झाला होता. त्याची जीभ जन्मापासूनच मोठी होती. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.
अमेरिकेतील ३ वर्षांचा मुलगा ओवेन थॉमस एक फार दुर्मीळ आजाराचा सामना करत आहे. या मुलाला Beckwith-Wiedmann सिंड्रोम म्हटलं जातं. ही एक अशी कंडीशन(Rare Condition) आहे ज्यात शरीराच्या काही अवयवांची अधिक वाढ होऊ लागते. ही कंडीशन १५ हजार मुलांपैकी एका मुलाला होते. ओवेनच्या केसमध्ये त्याची जीभ अधिक वाढत आहे. ओवेनची जीभ सामान्यापेक्षा चार पटीने जास्त लांब आहे.
ओवेन जेव्हा जन्माला आला होता तेव्हा त्याची आई थेरेसाने त्याच्या जिभेबाबत डॉक्टरांना विचारले होते. पण त्यांनी दुर्लक्ष करत सांगितलं होतं की, त्याची जीभ सूजली आहे म्हणून लांब आहे. मात्र, थेरेसाला नर्सने सांगितले होते की, तिने या मुद्द्यावर आणखी चौकशी करायला हवी. त्यानंतर डॉक्टरांनी टेस्ट सुरू केली आणि ओवेनला बीडब्ल्यूएसची समस्या असल्याचं समोर आलं.
ओवेनचा जन्म ७ फेब्रुवारी २०१८ ला झाला होता. त्याची जीभ जन्मापासूनच मोठी होती. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक रात्री झोपेत त्याचा श्वास रोखला जात होता. त्यामुळे तो उलटीही करत होता. या घटनेनंतर थेरेसा आणि तिचे पती घरी एक डिजिटल मॉनिटर घेऊन आले होते. ज्याने ओवेनचे हार्ट रेट आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करत होते. याने काही असामन्य असेल याने त्यांना मदत मिळत होती. (हे पण वाचा : दारू न पिताच या महिलेला चढते नशा, लिवरही झालं खराब; कारण वाचून व्हाल अवाक्...)
थेरेसाने सांगितले की, या डिजिटल मॉनिटरमुळे त्यांना अनेकदा इशारा मिळाला. त्यांच्या मुलांना ऑक्सिजन मिळत नसेल तर याने संकेत मिळत होता. त्यामुळे या मशीनमुळे त्याचा अनेक जीव वाचला. थेकेसानुसार, ओवेनच्या कंडीशनमुळे त्याला कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे दर तीन महिन्यांची त्याचा अल्ट्रासाउंड आणि ब्लड चेक केलं जातं.
ओवेनची एक सर्जरी ही झाली आहे. ज्यात त्याची दोन इंच जीभ कापली होती. यानंतर ओवेनची झोपेत झोपेत श्वास घेणं विसरण्याची समस्या दूर झाली आहे. ओवेनला सध्या जिभेमुळे काही रिस्क नाही. मात्र, डॉक्टर सांगतात की, त्याच्या जिभेची ग्रोथ अजूनही कमी झालेली नाही. ते एका ठोस उपायाच्या शोधात आहेत. ज्याने त्याच्या जिभेची ग्रोथ कमी केली जाईल.