Health tips: किडनी स्टोनवर फारच उपयुक्त आहे हे फळ, सहज मिळते! जास्त फायद्यासाठी 'असा' करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 02:53 PM2022-07-10T14:53:59+5:302022-07-10T15:09:14+5:30

आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय (Kidney stone remedy) सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा किडनीस्टोन वितळून जाईल आणि तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन काढण्यासाठी लिंबू (Home Remedies) कसे उपायोगी असते याविषयी सांगत आहोत.

kidney disease home remedies | Health tips: किडनी स्टोनवर फारच उपयुक्त आहे हे फळ, सहज मिळते! जास्त फायद्यासाठी 'असा' करा वापर

Health tips: किडनी स्टोनवर फारच उपयुक्त आहे हे फळ, सहज मिळते! जास्त फायद्यासाठी 'असा' करा वापर

googlenewsNext

किंडनी स्टोन (Kidney Stone) ही एक गंभीर समस्या आहे. यात होणार त्रास असह्य असतो. हा त्रास वाढल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे लागू शकते. या आजारात शरीरात मूत्रपिंडात किंवा पित्त मूत्राशयात स्टोन तयार होतात. मूत्रपिंडात तयार झालेले खडे औषधांच्या साहाय्याने लघवीद्वारे काढले (Remove Kidney Stone) जाऊ शकतात.

परंतु तुम्ही घरीच काही उपाय (Kidney stone upay) करून किडनी स्टोनवर मात करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय (Kidney stone remedy) सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा किडनीस्टोन वितळून जाईल आणि तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन काढण्यासाठी लिंबू (Home Remedies) कसे उपायोगी असते याविषयी सांगत आहोत.

लिंबू आणि पुदीना (Lemon and mint)
किंडनी स्टोनच्या समस्येवर मात करण्यासाठी लिंबू सोबत पुदीना देखील तुमची मदत करू शकतो. स्टोनमुळे किडनीची होणारी हानी टाळण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी पुदीन्याची पाणे वाटून ते पण्यात घाला आणि त्यात एक चमचा लिंबूपाणी मिक्स करा. तयार झालेले पेय घोट घोट करू प्या. नियमितपणे हा उपाय केल्यास तुम्हाला किडनी स्टोनपासून आराम मिळण्यास मदत होईल.

लिंबू आणि सफरचंदचे व्हिनेगर (Lemon and apple cider vinegar)
किडनी स्टोन काढण्यासाठी तुम्ही लिंबू आणि सफरचंदचे व्हिनेगरचा वापर करू शकता. लिंहूमध्ये असलेले घटक किडनी स्टोन काढण्यासाठी अतिशय प्रभावी असतात, तसेच सफरचंदच्या व्हिनेगरमधील अॅसिड स्टोन वितळवण्याचे काम करू शकते. या दोन्हींचा वापर केल्यास किडनी स्टोन वितळून छोटा होता आणि यूरिनच्या मार्गाने शरीरातून बाहेर पडतो. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धे लिंबू पिळा आणि त्यात एक चमचा सफरचंदचे व्हिनेगर घालून मिक्स करा. हे पेय नियमित प्यायल्यास तुमची किडनी स्टोनची समस्या दूर होऊ शकते.

लिंबू आणि तुळस (Lemon and basil)
लिबूसोबतच औषधी गुणधर्म असलेली तुळस देखील किडनी स्टोनवर मात करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. यात तुम्ही व्हीटग्रासचाही उपायोग करू शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात व्हीट ग्रासचा रस घ्या आणि त्यात एक चमचा लिंबू आणि एक चमचा तुळशीचा रस घालून मिक्स करा. हे पेय रोज सकाळी यूरीन पास करण्यापूर्वी प्यावे. यामुळे किडनी स्टोन शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

 

Web Title: kidney disease home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.