डायबेटीस असल्यास किडनी पेशंटनी रहा सावधान! वेळीच ओळखा धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 05:26 PM2022-01-30T17:26:11+5:302022-01-30T17:57:34+5:30

जर एखाद्याला डायबेटिस (Diabetes) असेल तर मग किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. डायबेटिस माणसाच्या शरीरावर गंभीर परिणाम करतो. जर एखाद्या वेळी डायबेटिस नियंत्रणाबाहेर गेला तर याचा शरीराच्या काही अवयवांवर परिणाम होतो, त्यातून माणसाला जीवही जाऊ शकतो.

kidney failure signs that you should not ignore | डायबेटीस असल्यास किडनी पेशंटनी रहा सावधान! वेळीच ओळखा धोक्याची घंटा

डायबेटीस असल्यास किडनी पेशंटनी रहा सावधान! वेळीच ओळखा धोक्याची घंटा

Next

किडनी (kidney) रक्तातून विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. जर आपल्या शरीरातील नसा, स्नायू आणि ऊतींचं संतुलन योग्य नसेल तर, मानवी शरीर योग्यरित्या कार्य करूच शकत नाही. त्यामुळे शरीरात किडनी हा अवयव निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. जर वेळीच काळजी घेतली गेली नाही किडनी निकामी किंवा खराब होऊ शकते. त्यात जर एखाद्याला डायबेटिस (Diabetes) असेल तर मग किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. डायबेटिस माणसाच्या शरीरावर गंभीर परिणाम करतो. जर एखाद्या वेळी डायबेटिस नियंत्रणाबाहेर गेला तर याचा शरीराच्या काही अवयवांवर परिणाम होतो, त्यातून माणसाला जीवही जाऊ शकतो.

द सनच्या रिपोर्टनुसार, शुगर लेव्हल वाढल्यास किडनीला रक्त पुरवठा करणाऱ्या नसाही खराब होऊ शकतात. असं झाल्यास किडनी योग्यरित्या शरीरातील रक्त स्वच्छ करू शकत नाही आणि मग किडनी निकामी होते, ज्याला किडनी फेल्युअर (Kidney Failure) असंही म्हटलं जातं. परिणामी शरीरात ब्लड प्रेशर (blood pressure) वाढू शकतं आणि त्यामुळे माणसाला हार्ट अटॅक (heart attack) देखील येऊ शकतो.

रिपोर्टनुसार, डायबेटिसच्या रुग्णांना त्यांची युरिन (Urine) म्हणजेच लघवी किडनी खराब होण्याचे काही संकेत द्यायला लागते. ज्यावरून किडनी खूप दबावाखाली काम करत आहे आणि व्यक्तीला त्वरित उपचारांची गरज आहे, हे समजतं. जर उपचारांना उशीर झाला तर किडनी निकामी होते. किडनी निकामी झाल्यास माणसाच्या मृत्यूचा धोका वाढतो. यासंदर्भात झी न्यूजने वृत्त दिलंय.
हे आहेत किडनी फेल्युअरचे संकेत

बर्मिंगहॅमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलचे कंसल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. रिचर्ड विनय यांच्या मते, लघवी करताना फेस येणं सामान्य आहे. कारण लघवी करताना शरीरातून काही प्रोटिन्स (proteins) देखील बाहेर पडतात ज्यातून फेस तयार होतो. त्यामुळे लघवी करताना फेस आल्यास यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही. परंतु हा फेस (foam) जर जास्त प्रमाणात येत असेल तर ही मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. लघवी करताना जास्त फेस येण्याचा अर्थ तुमची किडनी नीट काम करत नाही, असा होतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फिटनेससाठी शरीरात प्रोटिनचे पुरेसे प्रमाण राखणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा प्रोटिन लघवीत मिसळून मग किडनीत पोहोचतात, तेव्हा किडनी ते फिल्टर करते आणि प्रोटिन्सला शरीरात ठेवत लघवीला जाऊ देते. यावेळी प्रोटिन लघवीसोबत थोड्या प्रमाणात गेल्यास चालतं मात्र, ते जास्त प्रमाणात गेल्यास किडनी नीट काम करत नाही, असं समजायचं.

किडनी फेल्युअरची दोन मुख्य कारणं आहेत. एक डायबेटिस आणि दुसरं म्हणजे हाय ब्लड प्रेशर (high blood pressure). रक्तामध्ये प्रोटिनची कमतरता झाल्यास शरीरात पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे फुफ्फुस आणि पेल्विससह शरीराच्या इतर भागांत सूज येते. यातून श्वसनाचा त्रास झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

तुमच्या लघवीला दुर्गंध येत असेल किंवा लघवीचा रंग बदलला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या दोन गोष्टीही किडनी फेल्युअरचे संकेत देतात. रात्री वारंवार शौचाला जाणं, वारंवार तहान लागणं, नेहमीपेक्षा जास्त थकल्यासारखं वाटणं, आपोआप वजन कमी होणं, प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येणं, जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणं आणि अस्पष्ट दिसू लागणं ही सर्व डायबेटिसची मुख्य लक्षणं आहेत. त्यामुळे डायबेटिस असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी, जेणेकरून त्यांच्या किडनीला हानी पोहोचणार नाही.

Web Title: kidney failure signs that you should not ignore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.