अभिनेत्री अनाया सोनीची किडनी फेल, काय आहेत याची कारणे आणि लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 09:53 AM2022-10-03T09:53:25+5:302022-10-03T09:54:31+5:30

Kidney failure symptoms causes : तिने सांगितलं होतं की, तिची किडनी फेल झाली. तिला डायलिसीसवर ठेवण्यात आलं आहे.

Kidney failure symptoms causes : Actress Anaya Soni suffers kidney failure | अभिनेत्री अनाया सोनीची किडनी फेल, काय आहेत याची कारणे आणि लक्षणे!

अभिनेत्री अनाया सोनीची किडनी फेल, काय आहेत याची कारणे आणि लक्षणे!

googlenewsNext

Kidney failure symptoms causes : नामकरण, इश्क में मरजावां आणि मेरे भाई साई सारख्या मालिकांमध्ये काम केलेली  अनया सोनीच्या (Anaya Soni) किडनी फेल झाल्या आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली होती. तिने सांगितलं होतं की, तिची किडनी फेल झाली. तिला डायलिसीसवर ठेवण्यात आलं आहे आणि चेकअपनंतर ती किडनी ट्रांसप्लांटसाठी अप्लाय करेल. 

आजकाल कमी वयाच्या लोकांमध्येही किडनी संबंध समस्या दिसत आहेत. याचं कारण बदलती चुकीची लाइफस्टाईल, डायबिटीस, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी. किडनी फेल होण्याची कारणे काय असतात आणि किडनी फेल झाली हे कसं समजतं त्याचे संकेत काय असतात हे जाणून घेऊया.

किडनी फेल होणं नेमकं काय आहे?

Clevelandclinic नुसार, किडनी फेल होणं एक अशी स्थिती आहे ज्यात एक किंवा दोन्ही किडनी काम करणं बंद करतात. जर कुणाची किडनी फेल झाली तर डायलिसीस आणि किडनी ट्रांसप्लांटने उपचार होऊ शकतात. किडनी फेल होणं ही समस्या कधी कधी थोड्या काळासाठीही होते. पण नंतर काळजी घेतली गेली नाही तर किडनी परमनंट फेल होऊ शकते.

किडनी खराब होण्याची कारणे

किडनी फेल होण्याची कॉमन कारणे डायबिटीस आणि हाय ब्लडप्रेशर आहेत. जेव्हा किडनी अचानक काम करणं बंद करते तेव्हा त्याला इंटेन्स किडनी फेल म्हटलं जातं. इंटेन्स किडनी फेलची सामान्य कारणे खाली आहेत. 

ऑटोइम्यून किडनी डिजीज

काही औषधांमुळे

डिहायड्रेशन

लघवीमध्ये अडथळा

हृदयरोग

लिव्हर डिजीज

किडनी फेल समस्या रातोरात होत नाही. याला वेळ लागतो. जेव्हा एखादी अशी स्थिती तयार होते ज्यात जी किडनी फेलचं कारण बनते तेव्हा किडनी फेल होते. दोन्ही किडनी खराब होण्याला अनेक महिन्यांचा वेळ लागतो. यामुळे जर किडनी खराब झाली तर याची दोन कारणे असू शकतात.

डायबिटीस - जर कुणाचा डायबिटीस कंट्रोल राहत नसेल तर त्यामुळे त्यांच्या शरीरात ब्लड शुगर वाढते आणि सतत जास्त शुगर बनत असल्याने किडनी फेल होते. हे एक मोठं कारण आहे.

हाय ब्लडप्रेशर - हाय ब्लडप्रेशर म्हणजे रक्त रक्तवाहिन्यांमध्ये किती वेगाने वाहत आहे. जर रक्त जास्त वेगाने वाहत असेल तर किडनीला नुकसान होऊ शकतं आणि काळानुसार हे किडनी फेल होण्याचं कारण बनू शकतं.

क्रोनिक किडनी डिजीजची इतर काही कारणे

पॉलिसिस्टीक किडनी डिजीज एक आनुवांशिक स्थिती आहे. ज्यात किडनीच्या आत सिस्ट तयार होतं.

ग्लोमेरूलर डिजीज, जसे ग्लोमेरूलोनेफ्रायटिस जो किडनीची फिल्टर करण्याची क्षमता तयार करतो.

ल्यूपस आणि इतर ऑटोइम्यून डिजीज जे शरीराच्या इतर गोष्टींना प्रभावित करतात.

किडनी फेल झाल्याचे संकेत

- थकवा जाणवणे

- पोटदुखी किंवा उलटी

- डिमेंशिया

- फोकस करण्यात अडचण

- हात किंवा ढोपरांजवळ सूज

- पुन्हा पुन्हा लघवी लागणे

- मांसपेशी आखडणे

- कोरडी किंवा खाज असलेली त्वचा

Web Title: Kidney failure symptoms causes : Actress Anaya Soni suffers kidney failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.