Health tips: उन्हाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 05:46 PM2022-05-26T17:46:42+5:302022-05-26T17:49:55+5:30

मुतखड्याचा त्रास सामान्यतः वयानुसार वाढतो किंवा आपल्याला आधीच मुतखड्याचा त्रास असल्यास उतारवयात काळजी घ्यावी लागते.

kidney problems increases in summer season especially kidney stone know the remedies | Health tips: उन्हाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

Health tips: उन्हाळ्यात वाढतो किडनी स्टोनचा त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

googlenewsNext

हैदराबादमधील डॉक्टरांनी किडनीतून 206 खडे काढल्याच्या बातमीने ऑनलाइन जगतात खळबळ उडाली होती, आता लोक उन्हाळ्यात आपल्या आरोग्याचा अधिक विचार करत आहेत. खरं तर, किडनीतून हे खडे काढण्यासाठी डॉक्टरांनी एक तासाची की-होल सर्जरी (Key-hole) केली होती, त्यानंतर ते म्हणाले, "उन्हाळ्यात खूप जास्त तापमानामुळे डिहायड्रेशन होऊ शकते." उष्णतेच्या लाटेमुळे निर्जलीकरणामुळे अनेकदा मुतखडा (Kidney Stone) होतो. किडनी स्‍टोन आकारात वेगवेगळे असतात, ते दाण्‍यासारखे लहान आणि गोल्फ बॉलसारखे मोठेही असू शकतात. मुतखड्याचा त्रास पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो. मुतखड्याचा त्रास सामान्यतः वयानुसार वाढतो किंवा आपल्याला आधीच मुतखड्याचा त्रास असल्यास उतारवयात काळजी घ्यावी लागते.

मुतखड्याच्या काही सामान्य लक्षणांमध्ये तीव्र क्रॅम्पिंग किंवा पाठ आणि बाजूंना वेदना यांचा समावेश होतो. वेदना बहुतेकदा खालच्या ओटीपोटात किंवा मांडीच्या बाजूला सरकते आणि आपले शरीर मुतखड्याचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत असताना ही वेदना येऊ शकते आणि काही वेळाने कमी होऊ शकते.

किडनी स्टोनची इतर काही लक्षणे -

- वारंवार दाब देऊन लघवी करावी लागणे

- लघवी करताना जळजळ होणे

- रक्तासारखी लघवी गडद किंवा लाल होते. कधीकधी लघवीमध्ये लाल रक्तपेशींचा समावेश होतो.

- मळमळ आणि उलटी

- पुरुषांना लिंगाच्या टोकाला वेदना जाणवू शकतात

मुतखड्याचा आकार लहान असेल तर तो औषधांनी तो फोडून लघवीद्वारे बाहेर काढता येतो, यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली काही औषधे घेतली जाऊ शकतात. पण, आकार मोठा असेल आणि तुम्हाला तीव्र वेदना होत असतील तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

मुतखडा टाळण्यासाठी काय करावे?
किडनी स्टोन टाळण्यासाठी सर्वात सोपा आणि साधा उपाय म्हणजे चांगले हायड्रेटेड राहणे. म्हणजे उन्हाळ्यात अधिकाधिक द्रवपदार्थ घ्या. या ऋतूत, जेव्हा तुम्ही व्यायाम करत असाल किंवा खेळ खेळत असाल, तेव्हा नक्कीच द्रवपदार्थ घ्या. साध्या पाण्यापासून ते फळांचे रस आणि भाज्यांच्या रसापर्यंत द्रव पदार्थांचा आहारात पुरेसा उपयोग करा.

मात्र, आपले आरोग्य आणि साखरेचे प्रमाण संतुलित करण्यासाठी, नॉन-कॅलरी किंवा कमी-कॅलरी पेये पिणे चांगले आहे. अल्कोहोलयुक्त पेये टाळा कारण ते द्रव कमी करतात आणि अनावश्यक कॅलरीज वाढवतात.

Web Title: kidney problems increases in summer season especially kidney stone know the remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.