लहान मुलांमध्ये 'या' गोष्टींमुळे वाढते किडनी स्टोनची समस्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:44 AM2023-07-12T10:44:19+5:302023-07-12T10:45:40+5:30

Kidney stone : किडनी स्टोनची समस्या केवळ मोठ्यांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही अधिक बघायला मिळत आहे. जाणून घ्या कारण...

Kidney stone in children : Stop feeding these things to children immediately to avoid kidney stones in them | लहान मुलांमध्ये 'या' गोष्टींमुळे वाढते किडनी स्टोनची समस्या, वेळीच व्हा सावध!

लहान मुलांमध्ये 'या' गोष्टींमुळे वाढते किडनी स्टोनची समस्या, वेळीच व्हा सावध!

googlenewsNext

Kidney stone : आजकाल किडनी स्टोनची समस्या खूप जास्त वाढली आहे. याची कारणेही वेगवेगळी आहेत. अ‍ॅंटीबायोटिक्स, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आणि उष्ण वातावरण यामुळे तरूण व लहान मुलांमध्येही किडनी स्टोनची समस्या वाढत आहे. 

अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये एका रिसर्चमधून समजलं की, 30 वयाआधी किडनी स्टोनची समस्या वयस्क लोकांचा आजार समजली जाते. पण आता बघण्यात आलं आहे की, प्रत्येक वयातील लोकांनी ही समस्या गंभीरपणे वाढत आहे.

किडनीमध्ये तयार होणारे स्टोन खनिज आणि लवण जमा झालेलं रूप असतं. जे अनेकदा आपल्या मुत्र मार्गाला बाधित करतं. आकडेवारी सांगते की, आता ही समस्या कमी वयाच्या लोकांनाही होत आहे. अभ्यासकांचं मत आहे की, आजकाल जंक फूड, अ‍ॅंटी-बायोटिकचं सेवन खूप वाढलं आहे आणि तापमानातही वाढ होत असल्याने ही समस्या वाढत आहे.

हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणाशी संबंध

किडनी स्टोनची समस्या ही पिवळ्या रंगाच्या स्टोनची एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ज्याला नेफ्रोलिथियासिस नावाने ओळखलं जातं. यात कॅल्शिअम, ऑक्सलेट आणि फॉस्फोरसारखे खनिज लघवीमध्ये जमा होतात आणि पिवळ्या रंगाचे कठोर स्टोन तयार होतात. कधी कधी तर हे वाळूसारखे बारीक कण असतात किंवा कधी कधी गोल्फ बॉलच्या आकाराचेही असतात. काही केसेसमध्ये हे स्टोन लघवीच्या माध्यमातून निघून जातात. पण अनेक लघवीच्या मार्गात अडकतात. ज्यामुळे खूप जास्त वेदना आणि ब्लीडिंगचा सामना करावा लागतो.

लहान मुलांना एनर्जी ड्रिंकने जास्त धोका

चिप्स, एनर्जी ड्रिंक आणि डबाबंद पदार्थ खाल्ल्याने शरीरात जास्त खनिज जमा होतं, ज्यामुळे स्टोनची समस्या वाढू शकते. खासकरून लहान मुलांचं कमी पाणी पिणं आणि फ्रुक्टोजचं अधिक प्रमाण असलेल्या ड्रिंकचं सेव फार घातक ठरतं.

Web Title: Kidney stone in children : Stop feeding these things to children immediately to avoid kidney stones in them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.