किडनी स्टोनच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये 'या' ३ गोष्टी, अधिक वाढू शकते समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 02:56 PM2024-09-21T14:56:09+5:302024-09-21T15:05:00+5:30
Kidney Stone : जेव्हा रक्तात कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडिअमसहीत इतरही मिनरल्सचं प्रमाण वाढतं तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन छोट्या छोट्या स्टोनचं रूप घेतात. ज्याला किडनी स्टोन म्हटलं जातं.
Kidney Stone : आजकाल किडनी स्टोनची समस्या फारच कॉमन झाली आहे. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी आहे. किडनीद्वारे शरीरातील रक्त फिल्टर होतं. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. रक्त फिल्टर करत त्यातील सोडिअम, कॅल्शिअम आणि इतर मिनरल्सचे सूक्ष्म कणं लघवीसोबत शरीरातून बाहेर निघतात. पण जेव्हा रक्तात कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडिअमसहीत इतरही मिनरल्सचं प्रमाण वाढतं तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन छोट्या छोट्या स्टोनचं रूप घेतात. ज्याला किडनी स्टोन म्हटलं जातं.
किडनी स्टोनची समस्या ही सामान्य मात्र गंभीर समस्या आहे. ही समस्या झाल्यावर खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. काही गोष्टी आहारातून काढव्या लागतात, कारण याने किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते. अशात आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, किडनी स्टोन झाल्यावर काय काळजी घ्यावी.
मिठाचं सेवन कमी करा
शरीरात सोडिअम म्हणजे मिठाचं प्रमाण अधिक असेल तर याने लघवीमध्ये सोडिअमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जेवण करताना वरून मीठ घेणं टाळलं पाहिजे आणि सोडिअम असलेल्या इतर पदार्थांचं सेवनही कमी केलं पाहिजे. बाहेर जेवणामध्ये सोडिअमचं प्रमाण अधिक असतं.
मांसाहार कमी करा
रेड मीट, चिकन, पोल्ट्री आणि अंड्यांमुळे शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. जास्त प्रमाणात प्रोटीनचं सेवन केल्याने लघवीमध्ये सायट्रेट नावाचं रसायन कमी होतं. सायट्रेटचं काम किडनी स्टोन रोखण्याचं असतं. त्यामुळे प्लांट बेस्ड प्रोटीनचं सेवन करा. प्रोटीन मिळवण्यासाठी केवळ मांसाहार करावा असं नाही तर वेगवेगळ्या डाळींमधूनही तुम्ही प्रोटीन मिळवू शकता.
कोल्ड ड्रिंक आणि कॅफीन
कोल्ड ड्रिंक आणि कॅफीनचं सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते. कारण यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. किडनी स्टोन असल्यावर जास्त चहा आणि कॉफी पिणं टाळलं पाहिजे. कोल्ड ड्रिंकचं सेवनही टाळलं पाहिजे. कोल्ड ड्रिंकमध्ये असलेल्या फॉस्फोरस अॅसिडने किडनीमध्ये स्टोनचा धोका वाढू शकतो.
किडनी स्टोन दूर करण्याचे उपाय
किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....
1) लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल
वर्षानुवर्षे लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिश्रित करुन गॉलब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केलं जातं. पण हा उपाय किडनी स्टोनसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अॅसिडमध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा.
2) डाळिंब
डाळिंबाचा रस आणि बीयांमध्ये अॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलडमध्येही मिश्रित करुन खाऊ शकता.
3) कलिंगड
मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअमपासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमसोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर काढला जाऊ शकतो.
4) राजमा
राजम्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात. याला किडनी बिन्स नावानेही ओळखलं जातं. राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारांवर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो.