रोजच्या आहारानेही होऊ शकतो किडनी स्टोन, जाणून घ्या किडनी स्टोनमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:56 AM2022-08-09T11:56:17+5:302022-08-09T11:56:56+5:30

Diet In Kideny Stone: जेव्हा आपल्या पोटात ऑक्जालेट, कॅल्शिअमसारखे क्रिस्टल्स जमा होतात तेव्हा एक गाठसारखी संरचना तयार होते. ही गाठ दगडासारखी कठोर असते. यालाच किडनी स्टोन किंवा स्टोन म्हटलं जातं.

Kidney Stone : What to eat and what not to eat in kideny stone problem | रोजच्या आहारानेही होऊ शकतो किडनी स्टोन, जाणून घ्या किडनी स्टोनमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये!

रोजच्या आहारानेही होऊ शकतो किडनी स्टोन, जाणून घ्या किडनी स्टोनमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये!

googlenewsNext

Diet In Kideny Stone: किडनी स्टोनची समस्या अलिकडे फार सामान्य झाली आहे. ही समस्या चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे जास्त प्रमाणात बघता येते. आपल्या आहारात काही असे पदार्थ असतात जो पोटात जमा होऊन स्टोनचं रूप घेतात. किंवा यांमुळे बारीक स्टोन तयार होऊ शकतात. अशात हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की, किडनी स्टोनपासून कसा बचाव करावा आणि किडनी स्टोन दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे.

काय असतो किडनी स्टोन?

जेव्हा आपल्या पोटात ऑक्जालेट, कॅल्शिअमसारखे क्रिस्टल्स जमा होतात तेव्हा एक गाठसारखी संरचना तयार होते. ही गाठ दगडासारखी कठोर असते. यालाच किडनी स्टोन किंवा स्टोन म्हटलं जातं. स्टोन किडनीमध्ये होतो त्यामुळे याला किडनी स्टोन म्हटलं जातं.

किडनी स्टोन असताना काय खावं?

- किडनी स्टोन रोखण्यासाठी पुन्हा पुन्हा भरपूर पाणी प्यायला हवं. दिवसभरातून साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं.

- जर तुम्हाला किडनी स्टोन असेल आणि तो वाढण्यापासून रोखण्यासाठी हाय फायबर असलेल्या पदार्थांचं जास्त सेवन करावं. हे केलं तर स्टोन वाढण्यापासून रोखता येतं.

- किडनी स्टोनपासून वाचण्यासाठी सायट्रिस अॅसिड असलेले पदार्थ जसे की, संत्री, लिंबू, मोसंबी इत्यादींचं सेवन केलं पाहिजे. सायट्रिक अॅसिडमध्ये कॅल्शिअम-ऑक्जालेट जमा होण्यापासून रोखण्याची क्षमता असते. याने किडनी स्टोनच्या समस्येपासून बचाव करता येऊ शकतो.

- नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या खाऊनही तुम्ही किडनी स्टोनची समस्या दूर करू शकता.

- बेलफळ, बेलाची पाने, जंगली गाजर, बीट यांसारखी फळं खाऊनही तुम्ही किडनी स्टोनच्या समस्येपासून बचाव करू शकता. 

- कलिंगड, आर्टिचोक्स, मटर, एस्परेगस, लेट्यूस यात सोडिअम भरपूर प्रमाणात असतं. यांचाही आहारात समावेश करावा. तसेच ऊसाचा रसही किडनी स्टोनमध्ये फायदेशीर असतो.

काय खाऊ नये?

- किडनी स्टोनपासून वाचण्यासाठी किंवा स्टोनची वाढ रोखण्यासाठी असा आहार घ्यावा, ज्यात ऑक्जलेट, सोडिअम आणि कॅल्शिअम असू नये.

- हाय ऑक्जालेट असलेली फळं आणि भाज्या जसे की, टोमॅटो, सफरचंद, पालक हे टाळा.

- किडनी स्टोन झाला असेल तर नट्स खाणंही टाळलं पाहिजे. याने स्टोन वाढण्यास मदत मिळते.

- अंडी, मांस, मासे खाणं टाळलं पाहिजे.

- दुधापासून तयार पदार्थांमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे दही, लोणीसारखे पदार्थ खाऊ नये.

- मूळा, गाजर, लसूण, कांद्यात सोडिअम आणि ऑक्जालेट जास्त प्रमाणात आढळून येतं. जर तुम्हला किडनी स्टोनची समस्या असेल तर यांचं सेवन टाळावं.

- किडनी स्टोन असेल तर दारूचं सेवन अजिबात करू नये.

Web Title: Kidney Stone : What to eat and what not to eat in kideny stone problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.