कोणत्या वयातील महिलांनी किती झोपायला हवं? जाणून घ्या नेहमी तरूण दिसण्याचा 'स्लिप प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:33 AM2020-08-24T11:33:49+5:302020-08-24T11:34:57+5:30
काही महिला घरच्या कामात व्यस्त असतात. तर काही नोकरी निमित्ताने बाहेर जात असल्यामुळे त्यांना जास्तवेळ मिळत नाही. त्याचा परिणाम झोपेवर होतो.
शरीर नेहमी फीट आणि चांगले ठेवण्याासाठी नेहमी एक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. तसंच रोज पुरेशी झोपही घ्यायला हवी. सहसा महिलांनी निरोगी राहण्यासाठी जितक्या प्रमाणात झोप घ्यायला हवी. तितक्या प्रमाणात झोप घेताना दिसून येत नाहीत. काही महिला घरच्या कामात व्यस्त असतात. तर काही नोकरी निमित्ताने बाहेर जात असल्यामुळे त्यांना जास्तवेळ मिळत नाही. त्याचा परिणाम झोपेवर होतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या वयातील महिलांनी किती झोपायला हवं याबाबत सांगणार आहोत.
५ ते १६ वर्ष वयोगट
या वयोगटात शारीरिक विकास वेगानं होतो. त्यामुळे ८ ते १० तासांची झोप घेणं गरजेचं आहे. शक्य नसल्यास कमीतकमी ७ तास तरी झोप घ्यायला हवी. यापेक्षा जास्त म्हणजेच ११ तास झोपणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
१७ ते २५ वर्ष
या वयोगटातील मुलींनी ७ ते ९ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. या वयात नोकरी, अभ्यास अशा वेगवेगळ्या स्वरुपाची ताण तणावाची स्थिती निर्माण होते . १७ ते २५ वर्ष वयोगटातील लोक चहा आणि कॉफीचं सेवन मोठ्या प्रमाणात करतात. पण झोपण्याआधी कॉफी चहा अशा पदार्थांचे सेवन करू नका. कारण त्यामुळे तुमची झोप उडू शकते.
२६ ते ६० वर्ष
या वयोगटातील महिलांनीही ७ ते ९ तास झोपायला हवं. कारण कमी झोपल्यामुळे त्वचेवर परिणाम होऊन तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू शकता. झोप येत नसल्यास झोपण्याआधी एखादं पुस्तक वाचल्यास फायदेशीर ठरू शकतं.
६० वर्षावरील
या वयोगटातील महिलांनी ७ ते ८ तास झोप घेणं गरजेचं आहे. हलका आहार घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. चालणं, व्यायाम करणं किंवा योगा केल्यास झोपेवर परिणाम होणार नाही. शांत झोप येईल. शक्यतो अंगावर पांघरूण घेऊन झोपल्यास फायद्याचं ठरेल. जेव्हा व्यक्ती झोपते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान कमी असते. झोपण्याच्या १ तास आधीपासून ही प्रक्रिया सुरू होते.
या प्रक्रियेमुळे शरीर तापमान नियंत्रणात ठेवण्याची समस्या कमी झालेली असते. व्यक्ती रॅपिड आय मुव्हमेंटमध्येमध्ये पोहोचलेली असते. म्हणजेच स्लीप सायकल सुरू झालेली असते. डोळे बंद करून सौम्य गतीने बुबुळं इकडे तिकडे फिरत असतात. त्यावेळी पांघरूण किंवा चादर व्यक्तीला संपूर्ण रात्रभर गरमी देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीर कापत नाही. याशिवाय रात्री झोपताना शरीर झाकून झोपणं गरजेचं आहे. रात्री झोपण्याच्या एक तास आधी मोबाईलचा वापर करू नका. स्क्रिनपासून स्वतःला लांब ठेवा. नियमीत व्यायाम केल्यास झोप शांत आणि चांगली येईल.
हे पण वाचा-
Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण
Coronavirus: कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार - डॉ. संजय ओक