हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:26 PM2020-05-06T12:26:20+5:302020-05-06T12:41:07+5:30
रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन हृदयासंबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते.
अनेकदा हृदयाच्या आजारांची लक्षणं दिसत नसतानाही व्यक्तीला गंभीर रोगांची लागण होते. सुरूवातीला सामान्य दिसणारी लक्षण हृदयरोगाचे कारण ठरू शकतात. एका रिसर्चनुसार महिलांमध्ये मेनोपॉजच्या स्थितीत म्हणजेच ४० ते ५३ या वयात हृदयरोगाची लक्षणं दिसून येतात. त्यात हॉट फ्लॅश, कानांशी जोडलेल्या समस्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातून दाणे बाहेर निघणे,ओरलहेल्थ यांचा सुद्धा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला याच लक्षणांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला आजारांचा सामना करावा लागणार नाही.
कानांवर क्रिज तयार होणं
हृदयाच्या आजारांमध्ये या लक्षणांचा सुद्धा समावेश होतो. अमेरिकेतील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कांनाच्या पडद्यावर बाहेरून क्रिज दिसल्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस या आजाराचं लक्षण असू शकतं. याशिवाय रक्तवाहिन्यांच्या सेरेब्रोवास्कुलर या आजाराचे संकेत सुद्धा असू शकतात.
फॅटी दाणे दिसणे
हातांचे कोपरे, गुडघ्यावर किंवा पापण्यांवर फॅटी दाणे दिसत असतील म्हणजे लहान लहान डागांप्रमाणे दाणे तयार झाले असतील तर हृदयासंबंधी आजारांचे संकेत असू शकतात. हा एक अनुवांशिक आजार असून फॅमिलियल हाइपर कोलेस्ट्रोलेमिया असलेल्या लोकांमध्ये ही समस्या दिसून येते.
छातीत वेदना
व्यायाम किंवा काही उत्सुकता असली की सुद्धा छातीत धडधडते. पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृदयात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते. छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोनाच्या महामारीत लोकांना घरच्याघरी उद्भवत आहेत 'या' गंभीर समस्या)
ओरल हेल्थ
तुम्हाला जर दातांमध्ये ढिलेपणा, हिरड्यांमधून रक्त येणं किंवा हिरड्या सुजण्याची समस्या उद्भवत असेल तर दुर्लक्ष करता कामा नये कारण तुमचा विश्वास बसणार नाही पण ही लक्षणं हृदयरोगाची असू शकतात. ताोंडातून खराब बॅक्टेरिया रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन हृदयासंबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते. (हे पण वाचा-युटीआय आणि यीस्ट इन्फेक्शनमध्ये 'हा' आहे फरक, लागण होण्याआधी जाणून घ्या लक्षणं)