जास्त केसगळती होते? गर्भधारणेसाठी होऊ शकते समस्या, जाणून घ्या कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:33 AM2019-12-11T10:33:50+5:302019-12-11T10:33:56+5:30
वातावरण बदलताच काही महिलांना केसगळतीची समस्या जास्त भेडसावते. ही केसगळती नियमित होत असेल तर महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.
वातावरण बदलताच काही महिलांना केसगळतीची समस्या जास्त भेडसावते. ही केसगळती नियमित होत असेल तर महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कारण केसगळती तुमच्या खराब आरोग्यासोबतच एका गंभीर आजाराकडे इशारा करतात. एक असा आजार ज्याने महिलांना गर्भधारणेसाठी समस्या होऊ शकते. चला जाणून घेऊ या आजाराबाबत...
या गंभीर आजाराचं नाव आहे पोलिसिस्टिक ओविरिअन सिंड्रोम(PCOS). हा आजार साधारणपणे २५ ते ४५ वयोगटातील महिलांवर हावी होताना बघायला मिळतो. या आजारात महिलांच्या डोक्याचे केस गळतात आणि वजन वेगाने कमी होऊ लागतं. सोबतच शरीराच अशा अवयवांवर केस वाढायला सुरूवात होते. जिथे साधारणपणे केस नसतात. चेहरा, मान आणि बोटांवरही अधिक केस येतात.
गर्भधारणेसाठी अडचण
ज्या महिलांना PCOS ची समस्या असते. त्या महिलांना जर वेळीच उपचार मिळाले नाही तर त्यांना गर्भधारणेसाठी समस्या निर्माण होतात. त्यामुळे इच्छा असूनही त्या आई होऊ शकत नाहीत. तसेच या आजाराचा परिणाम ब्रेस्ट, चेहरा, कंबर आणि पाठीवरही होतो. या अवयवांवर केस येऊ लागतात. कोलेस्ट्रॉल आणि डाइप २ डायबिटीसचा धोकाही वाढतो.
अंडाशयात गाठ
या सिंड्रोमने पीडित महिलांच्या शरीरात हार्मोनल असंतुलनची समस्या होते. ज्यामुळे त्यांच्या अंडाशयात गाठ तयार होते आणि यानेच त्यांना गर्भधारणेसाठी समस्या होऊ लागते.
काय आहे उपाय?
हा आजारावर उपाय औषधे आणि सर्जरीच्या माध्यमातून शक्य आहे. या समस्येची माहिती सुरूवातीलाच मिळाली तर काही काळ औषधे घेऊन आजार बरा होऊ शकतो. दुसरा पर्याय हा सर्जरीचा असतो. जर एखाद्या महिलेला PCOS ची समस्या असेल तर त्या उपचारासोबतच त्यांच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करून ही समस्या लवकर दूर करू शकतील. तसेच महिलांनी त्यांचं वजन नियंत्रित ठेवून आणि हेल्दी डाएट घेऊनही या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो.