तुम्ही कोणती उशी घेता? केस गळणं, सुरकुत्या नकोत; तर झोपताना वापरा 'ही' उशी.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 03:42 PM2020-03-27T15:42:49+5:302020-03-27T15:54:26+5:30
याचं कापड पॉलिस्टर किंवा नायलॉनचं असतं. त्यात अनेक एंटी मायक्रोबाईल गुण असतात. जे त्वचेला हेल्दी बनवण्याासाठी फायदेशीर ठरत असतात.
सध्या व्यस्त जीवनशैलीत अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण या समस्यांचा सामना करत असताना अशा अनेक गोष्टी असतात. ज्यांचाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला मोठी किंमत मोजावी लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
तुम्ही कसं झोपता हे तुमच्या आरेग्याच्या दृष्टीने खुप महत्वाचं असतं. जास्तीतजास्त लोक झोपण्यासाठी सिल्क आणि कॉटनच्या उशांचा वापर करतात. पण कॉपरच्या उशांवर झोपल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळत असतात. कारण त्यात कॉपर ऑक्साईटचे कण असतात. याचं कापड पॉलिस्टर किंवा नायलॉनचं असतं. त्यात अनेक एंटी मायक्रोबाईल गुण असतात. जे त्वचेला हेल्दी बनवण्याासाठी फायदेशीर ठरत असतात.
बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यात एंटी मायक्रोबियल गुण असतात. त्यामुळे नुकसानकारक बॅक्टेरिया संपवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. त्यामुळे फ्रिकशन होत असतं ते तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगलं असतं.
तेलकट त्वचेसाठी फायदेशीर
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कॉपरच्या उशीवर झोपल्यानंतर हळूहळू त्वेचेत बदल दिसून येतो. त्वेचला टाईट बनवण्यापासून त्वेचचा तेलकटपणा कमी करण्याचं काम याद्वारे केलं जातं
सुरकुत्या कमी करण्यासाठी
कॉपरच्या उशीवर झोपल्याने त्वचेवर घर्षण होतं त्यामुळे त्वचेला कोणतंही नुकसान पोहोचत नाही. त्वचा चांगली राहते. त्वचेवरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात.
केस गळत नाहीत
कॉपरच्या उशीच्या असा फायदा त्यामुळे केसांच उशीवर घर्षण होत असल्यामुळे केस गळणं काही प्रमाणात थांबतं. केसांची वाढ सुद्धा चांगली होते. म्हणून महागड्या थेरेपी आणि शॅम्पू्च्या वापरापेक्षा एकदा हाही प्रयोग करून बघा.