रोज माठातलं पाणी प्याल; तर गंभीर आजारांपासून लांब राहाल, वाचा गुणकारी फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 03:13 PM2020-05-18T15:13:47+5:302020-05-18T15:14:48+5:30
साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते. अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा.
उन्हाळ्याच्या वातावरणात सगळ्यांनाच थंड पाणी प्यावसं वाटतं असतं. घरोघरी सर्रास उन्हाळ्याच्या ४ महिन्यात फ्रिजचं थंड पाणी प्यायलं जातं. खूप कमी लोकांच्या घरी उन्हाळ्यात सुद्धा माठातलं पाणी पितात. तुमचा विश्वास बसणार नाही पण माठातलं पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. सध्या कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रसारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते. अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा.
माठातील पाणी प्यायल्यामुळे त्वचेसंबंधी समस्या दूर होतात. पुळ्या, मुरूम, त्वचेसंबंधित इतर आजार दूर होतात. त्वचा चमकदार दिसते. माठातील पाणी नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले असल्यामुळे ते पाणी पिण्याने कोणत्याही आरोग्याच्या समस्या होत नाहीत.
घरी बसून जर तुम्हाला पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल म्हणजेच पोट साफ न होणं, एसिडिटी होणं, छातीत जळजळणं अशा समस्या उद्भवत असतील तर फ्रिजमधील पाण्याचे सेवन करू नका. थंडगार फ्रिजचे पाणी पिण्यामुळे तुमची पचनसंस्था मंदावते. ज्याचा चुकीचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिजमवर होतो. मातीच्या भांड्यातील पाण्यामुळे एसिडिटीचा त्रास कमी होतो. म्हणून माठातलं पाणी प्यायला सुरूवात करा.
(image credit- brett cole)
फ्रिजमधलं पाणी हे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवून ठेवावे लागतात. ज्यामुळे त्या पाण्यात प्लास्टिक अथवा इतर घटक मिसळतात. मात्र माठातील पाण्यात कोणतेही केमिकल्स नसतात.
मातीच्या भांडयातील थंड पाणी पिण्यामुळे सर्दी,खोकला, घशाचे इनफेक्शन, ताप अशा समस्या उद्भवत नाहीत. कोरोनाच्या महामारीत लहान मोठ्या आरोग्याच्या तक्रारींपासून लांब राहायचं असेल तर या माठातल्या पाण्याचे सेवन करा.
'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत
कोरोनामुळे लोकांचं मानसिक संतुलन बिघडतंय? तज्ज्ञांनी केला खुलासा