लिहिण्याचे होणारे फायदे वाचाल तर कंटाळा येत असेल तरी कागद, पेन घेऊन बसाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 05:40 PM2020-02-23T17:40:34+5:302020-02-23T17:47:01+5:30
हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात. बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात.
(image credit-www.observerbd.com)
सध्याच्या काळात शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सोडता लिहताना कोणीही दिसून येत नाही. कॉम्प्युटरवर सगळेजण काम करत असतात. त्यामुळे कागद, पेन घेऊन लिहिण्याची संस्कृती आता दिसून येत नाही. अनेक दिवसांनी जर तुम्ही काही लिहायला बसत असाल तर अक्षर सुद्धा चांगलं येत नाही. एका अभ्यासानुसार लिहण्यामुळे ताण-तणाव कमी होतो. इतकंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया लिहिण्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.
एका रिसर्चनुसार जेव्हा मुलं लिहायला बसत असतात. त्यावेळी त्याच्या आरोग्यात सुधारणा घडून येते. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेव्हा मुंल कोणत्याही कागदावर लिहीत असतात. तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचे आकलन लगेच होते. तुलनेने जेव्हा कॉम्प्युटरवर कोणतीही गोष्ट शिकवली जाते तेव्हा त्यांना लगेच आकलन होत नाही. कारण हाताने लिहित असताना त्यांची अनेक इंद्रिय काम करत असतात. बोटांच्या मासपेशी कार्यरत असतात.
जेव्हा तुमच्या मनात कोणताही विचार येतो तेव्हा लगेचचं तुम्ही तो कागदावर मांडायला हवा. हातांनी जेव्हा तुम्ही कागदावर लिहीत असता त्यावेळी गुड हार्मोन निर्माण होत असतात. त्यामुळे मानसीक निघून जाऊन आनंद वाटतो. विचार करण्याची प्रक्रिया चांगल्याप्रकारे कार्य करत असते.
तुम्ही अनेक प्रकारचे अनुभव लिहू शकता. चांगले वाईट कोणतेही अनुभव लिहीत असताना गुड हार्मोन एन्डॉर्फिन रिलीज होत असतो. त्यामुळे ताण-तणावाचं प्रमाण कमी होतं. ( हे पण वाचा-लघवी करताना जळजळ होते? यूरिन इन्फेक्शनच्या वेदना थांबवण्यासाठी आहारातून वगळा 'हे' पदार्थ)
लिहिल्यामुळे नवीन शिकण्याची क्षमता वाढते. लिहिण्याची प्रक्रिया डोक्याच्या कर्यशक्तीस वाढ देत असलेल्या अवयवांना प्रेरित करत असते. त्यामुळे मानसिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. ( हे पण वाचा-हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!)