ब्रेस्टचा आकार लहान मोठा असेल तर ब्रेस्ट कँन्सरचं कारण असू शकतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 03:06 PM2020-02-24T15:06:55+5:302020-02-24T15:15:04+5:30
जर छातीचा आकार समान नसेल तर आपल्याला कोणता आजार तर नाहीना मग दोन्ही बेस्ट समान आकाराचे कधी होणार. असा प्रश्न पडत असतो.
ब्रेस्ट कॅन्सरबदद्ल सध्याच्या काळात अनेक माध्यमातून जागृती केली जात आहे. त्यामुळे शहरी भागातील महिला आपल्या अवयवांबद्दल हेल्थ कॉन्शियस झाल्या आहेत. नकळतपणे जीवनशैलीतील बदलांमुळे महिलांना ब्रेस्टसंबंधीत समस्या उद्भवत असतात. अनेक महिलांना आपल्या छातीचा आकार लहान असेल किंवा मोठा असेल तर प्रश्न पडतो. आपलं शरीर असं का आहे. आपल्याला कोणता आजार तर नाहीना मग दोन्ही बेस्ट समान आकाराचे कधी होणार. असा प्रश्न पडत असतो.
वयस्कर नाही तर अनेक कमी वयातील मुलींमध्ये सुद्धा या समस्या उद्भवत असतात. सतत वाचण्यात येत असल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आजार तर नाही ना अशी भिती वाटत असते. एक्सपर्टसच्यामचे ब्रेस्ट कॅन्सरचं आहे की नाही हे समजण्यासाठी आपल्या ब्रेस्टमध्ये होणारे बदल समजायला हवेत आणि यासाठी महिलांना आपले ब्रेस्ट नेमके कसे असतात हे माहिती असायला हवं. जाणून घ्या कसे असतात महिलांचे ब्रेस्ट.
सामान्य ब्रेस्ट
तुमच्या दोन्ही ब्रेस्टचा आकार एकमेकांपेक्षा थोड्याप्रमाणात वेगळा असतो, एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा थोडा खालच्या बाजूला असतो, निपलभोवती केस असतात. म्हणजेच तुमची छाती आकाराने थोड्या फार फरकाने लहान मोठी असेल तर वेगळं वाटण्यासारखं आणि घाबरण्यासारख काही नाही. फक्त मासिकपाळी दरम्यान छातीत वेदना होतात.
गरोदरपणात
गरोदरपणात ब्रेस्ट मोठे होतात, निपलचा रंग गडद होतो, ब्रेस्टमधील रक्तवाहिन्या दिसू लागतात, एखादा फोड किंवा ट्युमरही असू शकतो मात्र तो कॅन्सरचा असेलच असं नाही.
स्तनपान करत असताना
गरोदरपणानंतर बाळाला दूध पाजत असताना स्तनांमध्ये बदल होत जातात. स्तनांना सूज येते, स्तन जड झाल्यासारखे वाटतात, मात्र बाळाला दूध दिल्यानंतर स्तन हलके होतात, बाळाला दूध देणं थांबल्यानंतर ब्रेस्टमधून येणारं दूध काही दिवसांनी आपोआप बंद होतं, ब्रेस्टफिडिंग करताना निपलला सूज येते, निपल क्रॅक होतात.
वाढत्या वयात
वयाची ४० वर्ष पूर्ण केल्यानंतर शारीरिक बदल होतात. दूध बनवणाऱ्या ग्रंथी आकुंचित पावतात. त्याठिकाणी नव्या फॅट टिश्यूंची निर्मिती होते, ब्रेस्ट जास्त सैल होतात आणि खाली येतात, वय वाढलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वाढतो. या व्यतिरीक्त जर तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ( हे पण वाचा-डायबिटीससह वजन कमी करण्यासाठी शेंगाचे सेवन कराल तर आजारांपासून लांब राहाल!)
ब्रेस्टवर अचानकएखादी गाठ येणं, ब्रेस्टभोवती, काखेजवळ सूज येणं, निपलभोवतालची त्वचा कोरडी, लाल आणि जाड होणे,निपलमधून रक्तस्राव किंवा दुधाव्यतिरिक्त इतर एखादा द्रव बाहेर पडणे. ब्रेस्ट उबदार होणे, ब्रेस्टला खाज येणं. ही लक्षणं म्हणजे गंभीर समस्येचं कारण असेलच असं नाही, मात्र हे सर्वसामान्य असे बदल नाहीत त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधा. ( हे पण वाचा-बसून की उभं राहून? पुरूषांची लघवी करण्याची कोणती पद्धत योग्य.....)