प्रायव्हेट पार्ट्सवर तीव्रतेने खाज येण्याची 'ही' असू शकतात कारणं; 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 05:32 PM2020-06-03T17:32:15+5:302020-06-03T17:39:52+5:30
या आजारांपासून लांब राहायचे असेल तर काही उपाय सांगणार आहोत.
ऋतू कोणताही असो प्रायव्हेट पार्ट्सवर खाज येण्याची समस्या अनेकांना उद्भवते. दुर्लक्ष केल्यामुळे या समस्येचं रुपांतर मोठ्या त्वचा रोगांमध्ये होते. फंगल इन्फेक्शन, यीस्ट इन्फेक्शन, लाल चट्टे येणं, पांढरं पाणी बाहेर येणं अशा समस्यांमुळे त्वचेवर तीव्रतेने खाज येते. आज आम्ही तुम्हाला या आजारांपासून लांब राहायचे असेल तर काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.
व्हजायनात खाज येण्याची कारणं
प्रायव्हेट पार्ट्समध्ये बॅक्टेरिया असतात. अँटिबायोटिक्स घेतल्यानंतर किंवा हार्मोन थेरेपी घेत असाल तर शरीरात एस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि चांगल्या बॅक्टेरियांपेक्षा वाईट बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. यामुळे यीस्ट इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे व्हजायनात खाज येते.
अनेकदा यामार्गातून पांढरं पाणी येत असल्याने अधिक तीव्रतेने त्रास जाणवतो.
सेक्स हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतरही व्हजायनामध्ये खाज येऊ शकते.
वॅक्सिंग केल्यानंतर किंवा रेजर फिरवल्यानंतर त्वचा लाल होऊन खाज येते.
मासिक पाळी येण्याआधीही अशी समस्या उद्भवते.
उपाय
दही एक नैसर्गीक प्रोबायोटीक आहे. दह्याच्या सेवनाने शरीरातील सकारात्मक बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी तेल लावून मालिश करावी. दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावावं. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालेल असं नाही त्यामुळे डॉक्टरांनीतेल लावू नये असं सांगितलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एलोवेराचा गर काढून तो इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही. त्वचेची आग होणार नाही.
जास्तीत जास्त पाणी प्या. संतुलित आहार घ्या, शरीर डिहायड्रेट होऊ देऊ नका
मासिक पाळीदरम्यान स्वच्छता बाळगा, सतत सॅनिटरी पॅड बदलत राहा.
घरात राहूनही 'असा' होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग; हे उपाय वापरा आणि संसर्गापासून लांब राहा
CoronaVirus: पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इफेक्टिव्ह ठरतील 'हे' घरगुती उपाय