दाढदुखीच्या वेदना सहन होत नाही? जाणून घ्या कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 06:11 PM2019-12-08T18:11:31+5:302019-12-08T18:36:45+5:30

अक्कल दाढ आल्यानंतर लोकांना अक्कल येते, असं म्हणतात. त्यामागे कारण आहे. कारण अनेकजणांना ही  दाढ  १७ ते २१ वयात येते.

Know the causes and remedies of dental pain | दाढदुखीच्या वेदना सहन होत नाही? जाणून घ्या कारणं आणि उपाय

दाढदुखीच्या वेदना सहन होत नाही? जाणून घ्या कारणं आणि उपाय

googlenewsNext

(Image credit-drakefamilydds.com)

अक्कल दाढ आल्यानंतर लोकांना अक्कल येते, असं म्हणतात. त्यामागे कारण आहे. कारण अनेकजणांना ही  दाढ  १७ ते २१ वयात येते. तर काही लोकांना २१ वय झाल्यानंतर येते. अक्कल दाढ ही तोंडाच्या मागच्या भागात येते. हिरड्यामधून अक्कल दाढ वर येते. जर तुम्ही सुध्दा अक्कल दाढीमुळे होणाऱ्या वेदनेमुळे त्रस्त आहात  तर आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अक्कल दाढ येताना जो त्रास होतो. त्यामागचं कारण कळेल.

सगळ्यांनाच अक्कल दाढ त्रासदायक ठरेल असं नाही. पण भरपूर लोकांना अक्कल दाढा अखेरीस त्रास देऊ लागतात. व काढाव्या लागतात. अक्कल दाढ किडून खूप दुखत असल्यास ती काढून टाकावी. अक्कल दाढेभोवती असलेली हिरडी वारंवार जेवण अडकल्यामुळे सुजत असल्यास ती काढणे योग्य ठरतं. अक्कल दाढेमुळे बाहेरच्या भागावर सूज असल्यासही ती काढून टाकावी. अक्कल दाढ तोंडात संपूर्णपणे बाहेर आलेली नसेल, ती वाकडी असेल व शेजारच्या दाताला त्रास देत असेल तर तिचा संसर्ग शेजारच्या दाताला होऊन तो किडत असेल तर ती काढून टाकावी. दात काढलेल्या ठिकाणी काही वेळ रक्तस्राव होतो. दुसर्‍या दिवशी तोंडाला सूज येऊन किंचित त्रास होऊ शकतो. 

(Image credit- grove dental)

तोंडाला दुर्गंधी येण्याच्या समस्या वाढतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास इन्फेक्शन अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पसमध्येच ट्युमर तयार होतो. अशावेळेस शस्त्रक्रिया करणे भाग असते. काहीवेळा अक्कल दाढेजवळ वाढणारा ट्युमर पाहता सर्जिकल एक्सट्राक्शन करणे गरजेचे असते.अक्कल दाढीमुळे होणाऱ्या तोंडाच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती पदार्थांचा वापर केल्यास आराम मिळेल.

(Image credit- forestwooddental)

दातदुखीवर मीठ ही उपयुक्‍त ठरतं. हिरड्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याशिवाय मिठाचा वापर केल्याने संसर्गाचा धोकाही कमी होतो. कांदा आणि लसून दाढीसाठी फायदेशीर ठरतात. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लमेटरी गुण आहेत. तसेच इतरही औषधी गुण आहेत. त्यामुळे अक्‍कलदाढ येतानाच्या वेदना कमी होतात.  कांद्यामध्ये जीवाणूप्रतिबंधात्मक आणि इतरही काही गुण असतात. त्यामुळे दाताच्या वेदनेत आराम मिळू शकतो. तसेच हिरड्यांच्या संसर्गापासूनही सुरक्षा मिळते. दातदुखीमध्ये पेरूची पाने आणि लवंग औषधांसारखे काम करतात. त्यात वेदना कमी करणारी आणि अँटीमायक्रोबियल गुण असतात. त्यामुळे दातदुखी कमी होते. 

Web Title: Know the causes and remedies of dental pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य