अंगदुखीचं कारण ठरू शकतो हाडांचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 10:06 AM2020-01-31T10:06:00+5:302020-01-31T10:21:59+5:30

अलिकडच्या काळात अनेक असे आजार उद्भवतात.

know the causes and solutions Bone cancer | अंगदुखीचं कारण ठरू शकतो हाडांचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

अंगदुखीचं कारण ठरू शकतो हाडांचा कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

अलिकडच्या काळात अनेक असे आजार उद्भवतात. ज्यांची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. रोजच्या चुकांमुळे आपल्याला आरोग्याशी संबंधीत आजार उद्भवत असतात. कॅन्सर हा असा आजार आहे ज्याचं नाव ऐकून लोक घाबरतात. आज आम्ही तुम्हाला कॅन्सरसंबंधी माहिती देणार आहोत. पण हा कॅन्सर हाडांचा आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण नकळतपणे सांधेदुखीचा त्रास मोठ्या आजाराचं कारण सुद्धा असू शकतो. 

हाडांचा कॅन्सर हा शरीरातील कोणत्याही भागांवर होण्याची शक्यता असते. बोन कॅन्सर हा हाडांच्या नसांवर परीणाम करत असतो. यामुळे हाडांना सुज येत असते आणि कोणतीही क्रिया करत असताना हाडांचे कार्य व्यवस्थित होत नाही. हळूहळू हा कॅन्सर शरीरात संपूर्ण ठिकाणी पसरतो. कॅन्सरच्या पेशी हाडांमध्ये आणि फुप्पुसांच्या आजूबाजूच्या भागात सुद्धा पसरत असतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण हाडांमधून जेव्हा हा कॅन्सर फुप्पुसांमध्ये पसरतो. तेव्हा त्याला लंग्स कॅन्सर न म्हणता हाडांचा कॅन्सर म्हटलं जातं. हाडांच्या कॅन्सरची लक्षणं काय आहेत जाणून घ्या. ( हे पण वाचा-वजन कमी करण्यासह दातांच्या समस्येवर फायदेशीर तुळशीचं पाणी, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्)

लक्षणं

हाडांमध्ये वेदना होणे.
प्रभावित झालेल्या भागावर  सूज येणे.
हाडं कमजोर होणे.
थकवा येणे.
वजन कमी होणे.


हाडांचा कॅन्सर होण्याची कारणं

कॅन्सर होण्याचं कारण अनुवांशिकता हे सुद्धा असू शकतं. तुमच्या कु़टूंबात जर कोणाला या आधी कॅन्सर झाला असेल तर तुम्हाला सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. वयाच्या ४० वर्षानंतर हाडं कमकुवत आणि कमजोर व्हायला सुरूवात होते त्यामुळे हाडांचा कॅन्सर होऊ शकतो. जर तुम्हाला कॅन्सर झाला असेल आणि तुम्ही कीमोथेरिपी किंवा स्टेम सेल ट्रांसप्लांटेशन केले असेल यांमुळे  रेडीएशनचा नकारात्मक परिणाम होऊन हाडांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. हा आजार झाला असल्यास एक्सरे, एमआरआय, बोन स्कॅन, पीईडी स्कॅन या चाचण्या करून तुम्ही  योग्य  तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. ( हे पण वाचा-त्वचा रोगासह ताण-तणावाचं कारण ठरू शकतो सोरायसिस, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

Image result for bone pain
उपाय

किमोथेरपी व रेडिओथेरपीसारख्या अत्याधुनिक औषधांमुळे या उपचारांचे खात्रीशीर फायदे रुग्णांना होत आहेत. काही प्रकारच्या हाडाच्या कॅन्सरसाठी हे उपाय यशस्वी ठरल्याने शस्त्रक्रियाही करावी लागत नाही. व्याधी वाढलेल्या अवस्थेत रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तरुण वयातसुद्धा आढळणारा हा आजार इतरत्र पसरण्याची शक्यता अधिक असते. दुर्दैवाने याचे लवकर निदान करण्याच्या खात्रीशीर तपासण्या अद्याप आपल्याकडे सगळ्या ठिकाणी उपलब्ध नाहीत.

Web Title: know the causes and solutions Bone cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.