लो ब्लड प्रेशरची समस्या उद्भवण्याची कारणं आणि घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:27 PM2019-10-12T12:27:22+5:302019-10-12T12:35:37+5:30

ब्लड प्रेशरची समस्या म्हटलं की, अनेक लोक हाय ब्लड प्रेशरच्या समस्येबाबत बोलतात. तसेच याची कारणं आणि लक्षणंही त्यांना माहीत असतात. परंतु, लो ब्लड प्रेशरबाबत फार कमी लोकांना माहीत असतं.

Know the causes of low blood pressure and home remedies to deal with it | लो ब्लड प्रेशरची समस्या उद्भवण्याची कारणं आणि घरगुती उपाय

लो ब्लड प्रेशरची समस्या उद्भवण्याची कारणं आणि घरगुती उपाय

googlenewsNext

ब्लड प्रेशरची समस्या म्हटलं की, अनेक लोक हाय ब्लड प्रेशरच्या समस्येबाबत बोलतात. तसेच याची कारणं आणि लक्षणंही त्यांना माहीत असतात. परंतु, लो ब्लड प्रेशरबाबत फार कमी लोकांना माहीत असतं. अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, जगभरामध्ये मोठ्या संख्येने लोक लो ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त आहेत. परंतु, अनेकांना लो ब्लड प्रेशरची लक्षणं माहीत नसतात. अनेकदा ही लक्षणं सामान्य समजून त्याकडे दुर्लक्षं करण्यात येतं. जर लो ब्लड प्रेशरच्या समस्येने गंभीर रूप धारण केलं तर मेंदूपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्व पोहोचण्यात आडथळे निर्माण होतात. त्यामुळे लो ब्लड प्रेशरच्या समस्येकडे फार दुर्लक्षं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. 

या कारणांमुळे उद्भवते लो ब्लड प्रेशरची समस्या...


 
डिहायड्रेशन

शरीराचं काम सुरळीत चालण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं पाणी. अनेकदा डॉक्टर्सही आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही त्या लोकांपैकी एक असाल, ज्यांचं शरीर फार लवकर डिहायड्रेट होतं. तर त्यासाठी तुम्ही काळजी घेणं आवश्यक असतं. जर तुमचं जास्त काम आउटडोर असेल तर तुम्हाला स्वतःजवळ पाण्याची बाटली ठेवणं गरजेचं असतं. तसेच आहारात पेय पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

लो ब्लड प्रेशर लवकर ठिक करण्यासाठी करा ही कामं... 

गरोदरपणात घ्यावी विशेष काळजी 

गरोदरपणात लो ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागते. गरोदरपणात ब्लड प्रेशर काही प्रमाणात लो होतं असून अनेकदा हे सामान्य ठरतं. तरिदेखील रेग्लुलर चेकअप करणं आईसाठी आणि बाळासाठी फायदेशीर ठरतं. 

हृदयाशी निगडीत समस्या 

हृदयाशी निगडीत काही आजारांमध्ये अनेकदा असं होतं की, शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहत नाही. परिणामी ब्लड प्रेशर लो होतं. 

पोषक तत्वांची कमतरता 

शरीरामध्ये काही आवश्यक पोषक तत्व जसं व्हिटॅमिन B-12 किंवा आयर्नची कमतरता होते. त्यामुळे अनेकदा अनिमिया सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे लो ब्लड प्रेशरची समस्या उद्भवू शकते. 

घरगुती उपाय 

- तसं पाहायला गेलं तर ब्लड प्रेशर असणाऱ्यांना कमी मीठ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु, ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरची समस्या असते त्यांना मात्र आहारात जास्त मीठ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु, काहीही उपाय करण्याआधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

- जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर मुबलक प्रमाणात पाणी प्या. पाणी आरोग्याचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जास्त पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनपासून बाव होतो. 

- प्रत्येक दिवशी कमीत कमी 2 वेळा कच्च्या बीटाचा एक कप ज्यूस घ्या. यामुळे लो ब्लड प्रेशरची समस्या दूर होण्यास मदत होते. 

- ब्लड प्रेशर लो झाल्यामुळे 1 कप स्ट्रॉन्ग ब्लॅक कॉफी प्या. यामुळे तुम्हाला होणारा त्रास दूर होण्यास मदत होईल. 

- तुम्ही बदामाची पेस्ट तयार करून कोमट दूधासोबत घेऊ शकता. त्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या दूर होण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

Web Title: Know the causes of low blood pressure and home remedies to deal with it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.