आजूबाजूला कोणी जांभया देत असेल तर तुम्हाला सुद्धा जांभया येतात? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 05:38 PM2019-12-25T17:38:27+5:302019-12-25T17:45:14+5:30

आपण ऑफिसमध्ये असताना किंवा घरात असताना जर कंटाळा आला असेल तर जांभया येतात.

Know the causes of yawning while others doing the same thing | आजूबाजूला कोणी जांभया देत असेल तर तुम्हाला सुद्धा जांभया येतात? जाणून घ्या कारण

आजूबाजूला कोणी जांभया देत असेल तर तुम्हाला सुद्धा जांभया येतात? जाणून घ्या कारण

googlenewsNext

आपण ऑफिसमध्ये असताना किंवा घरात असताना जर कंटाळा आला असेल तर जांभया येतात. तसेच जर तुमची  झोप पूर्ण झाली नसेल तरी सुद्धा जांभया येतात पण यापैकी काहीच कारण नसेल तरी फक्त आपल्या आजूबाजूचा एखादा व्यक्ती सतत जांभया देत असेल तरी आपल्याला येतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की समोरच्या एखाद्या व्यक्तील बघून आपण जांभया का देतो.  चला तर मग जाणून घेऊया काय आहे कारण.

 मानसशास्त्रीय अहवालानुसार एकमेकांना पाहून जांभया देणं हे लोकांच्या भावनीक स्थीतीशी निगडीत असणारी गोष्ट आहे. पण २०१४ मध्ये या अहवालाचे खंडण करण्यात आले. The Duke Centre for Human Genome Variation ने २०१४ मध्ये एक अभ्यासपूर्ण संशोधन केले त्यानुसार वाढत्या वयात एकमेकांना बघून  जांभया येण्याची शक्यता कमी होत जाते.


 ऑक्सिजनच्या कमतरतेने जांभया येतात. त्यामुळे नाकाने दिर्घ श्वास घेऊन तोंडाने हळूहळू हा श्वास सोडल्यास जांभया कमी होण्यास मदत होते. तसंच मित्रमंडळींसोबत असताना  व्हिडीओ आणि गेम  खेळत  बराच वेळ  घालवला तरी जांभया येतात. या अभ्यासाठी ३२८  लोकांवर हा प्रयोग करण्यात आला होता. या संशोधनादरम्यान  असं दिसून येत की इतरांना बघून जांभया देणं  हे फक्त काही काळासाठी असतं तसंच जसजसे वय वाढत जाते तसतसे  हि सवय मिटत जाते.

काही व्यक्ती हे जांभई देण्याच्या बाबतीत खूपच असंवेदनशील असतात. त्यांना कोणत्याही वातवरणात जांभई यायला वेळ लागतो. प्रत्येकाची शारीरिक स्थिती ही वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला  जांभया येण्याची कारणं वेगवेगळी सुद्दा असू शकतात. हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांमुळेदेखील जास्त जांभया येतात. जेव्हा हृदय आणि फुफ्फूसं योग्य काम करत नाही तेव्हा दम्याचा आजारही असू शकतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला पाहून जांभया देणं हे काही काळापूरता मर्यादित असते. 

Web Title: Know the causes of yawning while others doing the same thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.