स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असाल तर सावधान... पडू शकतं महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 09:41 AM2019-12-31T09:41:38+5:302019-12-31T09:48:11+5:30

सध्याच्या काळात सहज उपलब्ध होत असलेल्या स्टीलच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Know cooking a meal in a steel utensils it may harmful for health | स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असाल तर सावधान... पडू शकतं महागात 

स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असाल तर सावधान... पडू शकतं महागात 

googlenewsNext

सध्याच्या काळात सहज उपलब्ध होत असलेल्या स्टीलच्या भांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक धातूंनी मिळून स्टील तयार केलं जातं. स्टील हे लोह, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांपासून तयार केलं जातं. तसंच स्टीलच्या भांड्यात जेवण तयार केल्यास आरोग्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. पण नवीनच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार जर तुम्ही स्टीलच्या  भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करत असाल तर विविध आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. ह्या भांड्यांचे लवकर तापमान वाढते. त्यामुळे जेवण तयार करण्यासाठी या भांड्यांचा वापर करत असताना लक्ष देणं गरजेचं आहे.  महिला स्टीलचा वापर जास्त करतात कारण ही  भांडी स्वच्छ करण्यासाठी फार वेळ लागत नाही.

स्टेनेलेस स्टीलच्या भांड्यांवर ऑलिव्ह, कॉर्न आणि कॅनेला तेल यांच्या कोटींगने थर जमा होतो. तसंच त्यामुळे त्यावरचे बॅक्टीरीया सुद्धा वाढतात.  या नवीन रिसर्चमधील अभ्यासानुसार स्टीलच्या भांड्यांचा वारंवार वापर केल्याने तसंच ते घासल्याने त्या भांड्यांवर लहान लहान भेगा पडू लागतात. त्यामध्ये विषाणू तयार होण्याचा धोका असतो. 

स्टीलच्या भांड्यावर आलेले तडे डोळ्यांनी दिसू शकणार नाहीत असे सुक्ष्म असतात. त्यात लाखो विषाणू असू शुकतात. त्यांचा आकार खूप लहान असतो आणि मायक्रोमीटर मध्ये मोजले जातात.  या फटींमध्ये सालमोनेला, लिस्टिरिया  आणि ई-कोलाय असे सूक्ष्म विषाणू असतात. त्यामुळे इन्फेक्शन  होण्याचा धोका असतो. पण या भांड्यावर खाद्यतेलाचे कोटींग केलं असेल तर हा धोका टळतो. 

कॅनडाच्या ओंटारियो या ठिकाणचे रहिवासी असलेले यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो चे प्रोफेसर बेन हैटन  यांनी असे सांगितले की स्टीलच्या भांड्यावर रोजच्या खाद्यतेलाचे कोटींग असेल तर विषाणू वाढण्याचा धोका कमी होतो. खाद्यतेल हे  विषाणू वाढवण्यापासून वाचवतं. तसेच त्यामुळे याचा कोणताही नकारात्मक परिणाम आरोग्यावर होत नाही. त्यामुळे स्टीलची भांडी वापरत असताना काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे.

Web Title: Know cooking a meal in a steel utensils it may harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.