वॉटर बर्थ : नैसर्गिक प्रक्रियेची आस असणाऱ्यांसाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:12 PM2019-10-31T13:12:20+5:302019-10-31T13:16:26+5:30
गर्भवती माता नैसर्गिक औषध मुक्त, वेदना मुक्त आणि आरामशीर प्रसूतीचे स्वप्न पाहतात. वॉटर बर्थिंग बाळंतपणासाठी एक नैसर्गिक आणि निवांत पर्याय देते.
गर्भवती माता नैसर्गिक औषध मुक्त, वेदना मुक्त आणि आरामशीर प्रसूतीचे स्वप्न पाहतात. वॉटर बर्थिंग बाळंतपणासाठी एक नैसर्गिक आणि निवांत पर्याय देते. भारतात आता ही नैसर्गिक आणि पारंपारिक पद्धत अनुभवी आणि अत्यंत कुशल प्रसूतीशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचार्यांद्वारे पुरविल्या जाणार्या संस्थात्मक सेवांच्या माध्यमांद्वारे जागरूकता उत्पन्न झाल्याने लोकप्रियतेसह वाढत आहे. सदर लेखातून वॉटर बर्थबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया सूर्या हॉस्पिटल, मुंबई येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमित धुरंधर यांच्याकडून...
काय आहे वॉटर बर्थ?
वॉटर बर्थ बाळाला जन्म देण्याचा एक प्रकार आहे. जसं सिजेरियन किंवा नॉर्मल डिलिवरी असे प्रकार असतात. तसाच हादेखील एक प्रकार आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वॉटर बर्थ डिलिवरी नार्मल डिलिवरीचाच एक आधुनिक प्रकार आहे. ज्यामध्ये पाण्याचा वापर करण्यात येतो. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, या प्रोसेसमध्ये प्रसूती कळा कमी होतात आणि बाळाला जन्म देताना आईला कमी त्रास होतो. पाण्याच्या आतमध्ये असल्यामुळे महिलेच्या शरीरामध्ये एंड्रोफिन हार्मोन जास्त प्रमाणात रिलिज होतात. ज्यामुळे वेदना कमी होतात. तसेच असं सांगण्यात येतं की, जर वॉटर बर्थसाठी गरम पाण्याचा वापर करण्यात आला तर वेदना एवढ्या कमी होतात की, महिलेला पेन किलर देण्याची अजिबात गरज भासत नाही.
महिलांसाठी फायदेशीर... वॉटर बर्थचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे होतात.
वाढीव विश्रांती : जर जन्म देण्याच्या प्रक्रियेदरम्यान आई निवांत असेल तर तिचे शरीर एंडोर्फिन म्हणून ओळखले जाणारे हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे ही प्रक्रिया वेदना आणि तणावमुक्त होते, यामुळे नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिटोसिन,
प्रोस्टाग्लॅन्डिन आणि इतर सर्व हार्मोन्सची उत्पत्ती होते. आई निवांत असल्यामुळे प्लेसेंटल ऑक्सिजन परफ्यूजनही कमाल पातळीपर्यंत वाढण्यास मदत होते. तथापि, जर आई तणावात असेल तर तिचे शरीर अॅड्रेनलाईन, नॉरअॅड्रेनलाईन किंवा कॅटेकोलामिन्स सारख्या हार्मोन्सचे अत्यधिक उत्पादन करून आकुंचित होते आणि यामुळे नैसर्गिक प्रसूती होण्यात अडथळा निर्माण होतो आणि डॉक्टरांना हस्तक्षेप करणं गरजेचं होतं.
अल्प प्रसूती : पाणी स्नायूंना निवांत होण्यास मदत करते आणि एक सुखद भावना देते ज्यामुळे वेदना कमी होते, त्यामुळे शरीर सकारात्मक बनते आणि म्हणूनच रुग्णाची वेगवान प्रसूती सहज बनते. निवांत स्नायू आणि शरीर गर्भाशय ग्रीवाचा विघटन दर वाढवते आणि परिणामी संकुचन वाढते आणि बाळ जन्म नलिकेतून खाली सरकू शकते.
तरंगणे : आकुंचनादरम्यान आईला सहजपणा प्रदान करण्याव्यतिरिक्त हालचालींचे स्वातंत्र्य देखील मिळते ज्यामुळे उभे राहतांना गर्भाचे डोके सहज बाहेर पडते. उबदार शांत पाण्याखाली स्नायू आणि अस्थिबंधन निवांत असतात ज्यामुळे मुक्त हालचाल होते आणि ओटीपोटीचा व्यास वाढतो. तथापि, या आरामदायी वातावरणाला कुशल आणि प्रशिक्षित कर्मचार्यांकडून योग्यरितीने सहाय्य आणि देखरेख मिळणे आवश्यक आहे.
रक्तदाब कमी करते : आईच्या शरीरावर पाण्याच्या शिथिल करणाऱ्या परिणामामुळे चिंता कमी होते ज्यामुळे शांत वातावरण तयार होण्यास मदत मिळते आणि उच्च रक्तदाबाने ग्रस्त मातांना याचा फायदा होतो.
मूत्रद्वाराचे फाटणे कमी करते : पाण्यात जन्म देतांना मूत्रद्वाराचे फाटणे लक्षणीयरित्या कमी होते. आईची कोणत्याही आरामदायक स्थितीत राहण्याची क्षमता मूत्रमार्गाच्या स्नायूंची लवचिकता वाढविण्यास मदत करते ज्यायोगे फाटण्याची शक्यता कमी होते. जरी फाटणे उद्भवले तरी ते सहसा लहान असते.
बाळांना फायदे:
• गर्भाचे ऑक्सिजनेशन वाढते
• सौम्य संक्रमण होते
• जन्माचा आघात कमी होतो
• आरामशीर आणि शांत वातावरण असते
• संवेदी प्रेरणा कमी होतात
• त्वचा ते त्वचा संपर्क असतो
पोहण्याचे फायदे
• शारीरिक वाढ सुधारते
• संज्ञानात्मक कार्य सुधारते जसे की स्मृती आणि एकाग्रता.
खबरदारी
तयार असणे : नैसर्गिक सौम्य प्रसूती सोपी नाही, हे मॅरेथॉनमध्ये धावण्यासारखे आहे. शारीरिक आणि मानसिक तयारी करायला हवी.
पाण्याचे तापमान
हे शरीराच्या अंदाजे 34 आणि 38°C तापमानावर नियमित केले जावे. जर तापमान खूपच कमी असेल तर त्यामुळे बाळाला हायपोथर्मिया होऊ शकतो आणि पाण्याखाली श्वास घेण्यास उत्तेजन मिळू शकते. जर ते जास्त असेल तर ते आईच्या निर्जलीकरण आणि गर्भाच्या त्रासास कारणीभूत ठरू शकते.
विपरित वापर
पाण्यात जन्म देणे कमी जोखमीच्या गर्भधारणेसाठी असते ज्यांचे गर्भवती महिलांमध्ये प्रमाण 80% आहे. परंतु निश्चितपणे खालील गोष्टींसाठी नाही:
• जर गर्भाला किंवा आईला त्रास होत असेल
• हायपो किंवा हायपरथर्मिया
• गर्भधारणा 37 आठवड्यांपेक्षा कमी आहे (मुदतीपूर्वी प्रसव होणे)
• अँटे पार्टम रक्तस्राव
• जीडीएम, पीआयएच, थ्रोम्बोफिलिया सारख्या कोणत्याही वैद्यकीय अवस्था असतील.
• कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असेल. (पिटोसिन, एपिड्युरल इ.)
• पूर्वी खांद्याच्या डायस्टोसियाचा इतिहास आहे.