गरोदरपणात कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी असा घ्या आहार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:35 PM2019-12-30T12:35:28+5:302019-12-30T12:35:43+5:30
महिला गरोदर असताना अनेकदा त्यांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होण्याची शक्यता असते.
महिला गरोदर असताना अनेकदा त्यांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होण्याची शक्यता असते. गरोदर असताना विशिष्ट प्रकारचं डाएट करण्यासाठी सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे बाळ आणि आई या दोघांना पोषण मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे बाळाचा विकास व्यवस्थित होत असतो. गरोदरपणात व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे एनिमीया समस्या उद्भवू शकते. यापासून वाचण्यासाठी फोलेट, व्हिटामीन सी आणि आर्यनचे पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा. चला तर मग जाणून घेऊया आहारात कोणत्या घटकांचा समावेश असणं गरजेचं आहे.
आर्यन
तज्ञांच्या मतानुसार गरोदर महिलांनी दररोज कमीतकमी ३८ मिग्रा आर्यनचे सेवन करणं गरजेचं आहे. त्यासाठी गररोदरपणात महिलांनी आहारात बीट,राजमा. नारळाचं सेवन करायला हवं. त्यामुळे आर्यन शरीराला मिळत असतं. तिळाचा तसंच दुधीचा सुद्धा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.
फोलेट
नवीन पेशींची निर्मीती करण्यासाठी फोलेट महत्वाच असतं. यासाठी हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. तसंच शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बीया हे फोलेटचे प्रमुख स्त्रोत आहे. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते.
लोह
तुम्ही तुमच्या आहारात फळे, मोड आलेल्या शेंगा आणि आंबवलेले पदार्थ यांचा समावेश करून त्यातील जास्तीत जास्त लोह तुमच्या शरीरात शोषले जाईल याची तुम्ही खबरदारी घेऊ शकता. जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नका. कोणतीही गोष्ट अति खाणे टाळा. दररोज ८-१२ ग्लास पाणी पिऊन शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण कायम ठेवा.
संतुलित आहार
दुपारच्या आणि रात्रीच्या पोषक जेवणासाठी, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, राजगिरा यांच्यापैकी पूर्ण धान्याची निवड करा, त्यासोबत भाज्या आणि डाळी, शेंगा, अंडी, मासे किंवा चिकन असे प्रथिनयुक्त पदार्थ खा. पदार्थांची पाचकता वाढवणारे, तसेच त्यामधील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे आणि क जीवनसत्व वाढवणारे मोड आणणे आणि आंबवणे अशा पद्धती वापरा.
आहाराच्या वेळा
गरोदर स्त्रीला थोडे-थोडे आणि सतत काहीतरी खावे लागते, त्यामुळे तुमच्या आहाराच्या नियोजनामध्ये मध्य सकाळ आणि मध्य दुपारच्या आहाराचा समावेश करा. ताक, लस्सी, भाजलेले मखना, कडधान्ये हे पदार्थ दोन जेवणांच्या मध्ये खाण्यासाठी उत्तम ठरतात.