या सहा कारणांमुळे होतो डोकेदुखीचा त्रास, जी तुम्हाला माहीत सुध्दा नसतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:32 AM2019-12-13T11:32:49+5:302019-12-13T11:42:50+5:30
सतत कामाचा तणाव, व्यस्त जीवनशैली तसेच आहार घेण्याच्या सवयीत असलेली अनियमितता यांमुळे सतत आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.
सतत कामाचा तणाव, व्यस्त जीवनशैली तसेच आहार घेण्याच्या सवयीत असलेली अनियमितता यांमुळे सतत आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. त्यात डोकेदुखीची समस्या सर्वाधिक जाणवते. जाणून घेऊया अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सर्वाधिक जाणवतो.
चष्म्याचा वाढलेला नंबर, चहाची सवय असणे, डोक्याला मार लागणे, प्रवासाचा दरम्यान थकवा जाणवणे, दारू प्यायल्यानंतर डोकं जड होणे अशी कारणं डोकेदुखीची असू शकतात. अनेकदा ऑफिसमध्ये काम करत असताना मित्रमंडळींशी गप्पा मारता मारता चहा किंवा कॉफी प्यायली जाते. पण त्यात असलेले कॅफिन डोकेदुखीचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास शरीरासाठी घातक ठरते.
अनेकदा ऑफिसमध्ये बराचवेळ कामात व्यस्त असताना पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे शरीर कोरडं पडतं गरजेपेक्षा जास्तवेळ पाणी न प्यायल्याने आरोग्याशी संबंधीत विकार उद्भवतात. तसंच डोकं दुखीचे सगळ्यात मोठं कारण पाणी कमी पिणे हे असतं.
स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल हे डोकेदुखीचे कारणं आहे. स्त्रीयांना मासिक पाळीच्यावेळी डोकेदुखीची समस्या सर्वाधिक जाणवते. त्याचप्रमाणे ऑफीसमध्ये काम करत असताना चुकीच्या पध्दतीने बसल्यामुळे पचनशक्ती मंदावते. अपचनामुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो.
काम पुर्ण करण्याच्या नादात बराचवेळ उपाशीपोटी काम केल्याने डोकेदुखीची समस्या वाढते. काहीच न खाता बराचवेळ काम केल्याने गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातील संतुलन बिघडून डोकं दुखायला सुरूवात होते. त्यामुळे आपल्या शरीराची स्थिती ही आपण काम करताना कसं बसतो यावर सुध्दा अवलंबून असते.