गर्भनिरोधक गोळ्या घेताय? तर असा होईल परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 03:44 PM2019-12-16T15:44:55+5:302019-12-16T15:49:07+5:30
सध्याच्या काळात गर्भनिरोधक गोळ्या या कमी वयाच्या मुलीसुध्दा जास्त घेताना दिसतात.
सध्याच्या काळात गर्भनिरोधक गोळ्या या कमी वयाच्या मुलीसुध्दा जास्त घेताना दिसतात. बदलती जीवनशैली आणि राहणीमानाच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे या गोळ्या सर्वाधिक घेतल्या जातात. तुम्ही गर्भनिरोधक गोळीचे सेवन करण्याआधी जर कसलाही विचार करत नसाल तर ही गोष्ट फार महागात पडू शकते.
अशा भरपूर स्त्रिया आहेत ज्या गर्भधारणा रोखण्यासाठी (contraceptive pills) गर्भनिरोधक गोळ्या घेतात. पण त्या स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने होणाऱ्या परिणामांबद्दल गाफिल असतात. मासिक पाळीशी संबंधित समस्या या गोळ्याचं सेवन केल्यामुळे अधिक उद्भवतात. जाणून घ्या गर्भनिरोधक गोळ्यांचे परिणाम काय होतात.
१) हार्मोंन्सचे संतुलन बिघडणे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केलं तर शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. एका रिसर्चनुसार गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शरीरातील हार्मोन्सच संतुलन राहत नाही. त्यामुळे महिलांच्या मेंदुवर सुध्दा परिणाम होऊ शकतो.
२) वजन वाढते
या गोळ्यांमुळे फॅट असलेल्या पेशींचे प्रमाण वाढत नाही परंतु त्यांचा आकार वाढतो. तसेच या गोळ्यांच्या सेवनामुळे काही महिलांच्या छातीमध्ये आणि मागच्या भागात पाणी झाल्याचे देखील आढळून आले आहे. या गोळ्यांच्या सेवनाने मळमळणे , डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात. वेगवेगळ्या गर्भनिरोधक गोळ्यांचे वेगवेगळे परिणाम असू शकतात. त्यामुळे स्तन हळवे सुध्दा होऊ शकतात.
३) त्वचेच्या समस्या
गर्भनिरोधक गोळ्याच्या सेवनाने त्वचेसंदर्भात तक्रारी वाढू शकतात मुरमं येणे, त्वचेवर पुळ्या येणे या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. त्वचेवर काळे डाग पडण्याची समस्या सुध्दा निर्माण होऊ शकते.
४) पाळीची वेळ चुकणे
या गर्भनिरोधक गोळ्यांच्या ३ महिने नियमित सेवनानंतर गोळीच्या सेवनामुळे एकदा मासिकपाळी येऊन गेल्यावर दुसऱ्यांदा येणाऱ्या मासिकपाळच्या आधीच म्हणजे दोन मासिकपाळीच्या मधेच कधीतरी रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
५) केस गळणे
गर्भनिरोधक गोळ्यांच्या अति सेवनाने केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात. तसंच केस पिकणे आणि मुळं कमजोर होणे. अशा समस्या निर्माण होऊ शकतात.