पनीर खाण्याचे फायदे माहित असतील, आता जाणून घ्या तोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 03:43 PM2019-11-30T15:43:17+5:302019-11-30T15:49:35+5:30

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं.

know the disadvantages of eating Paneer | पनीर खाण्याचे फायदे माहित असतील, आता जाणून घ्या तोटे

पनीर खाण्याचे फायदे माहित असतील, आता जाणून घ्या तोटे

googlenewsNext

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं. यात फॅट्स पण असतात. अशावेळी आपल्या आहारात पनीरचा योग्य पद्धतीनं वापर कसा करावा. हे माहिती असणं आवश्यक आहे. पनीरमुळे प्रथिनं मिळतात. पनीरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं. पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं.  तसेच ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण  वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला दिला जातो. जे नियमीत व्यायाम करतात त्यांनी पनीर खाणं गरजेचे असतं. मात्र ते कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, तर जाणून घ्या पनीर किती आणि कधी खावं. 

 पनीरचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढतं. लिव्हर मजबूत राहतं. वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यात पनीरचे सेवन फायदेशीर ठरतं. पनीरचे नियमीत सेवन केल्याने सांधेदुखीची समस्या दुर राहते. पनीर एका दिवसात २०० ग्रॅमहून अधिक खाऊ नये. एका वेळेत १०० ग्रॅम पनीर पुरेसं असतं. रात्री उशीरा पनीर खाऊ नये. पनीर नेहमी वेगवेगळ्या भाज्यांसोबत मिक्स्ड करून खावं. त्यातील प्रोटीन आणि फायबरमुळे आपलं पोट खूप वेळेसाठी भरलेलं जाणवतं. आणि ते शरीरात खूप चांगल्या पद्धतीनं पचवल्या जातं. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्या, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशिअमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतात.

(Image credit-Olive magazine)

पनीर खाण्याचे फायदे आणि तोटे

१) पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी  फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.
२) पनीरचे सेवन केल्यास आजारांपासून दूर राहता येतं
३) पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.

४) शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन कमी होते. कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
५) पनीरमध्ये कॅल्शियमही जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला. तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.
६) पनीर जास्त खाल्ल्यास कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोका असतो.
७) कच्चा पनीर खाणं हे गरोदर महिलांसाठी नुकसानकारक ठरू शकत.

Web Title: know the disadvantages of eating Paneer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.