वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करता? 'या' गंभीर आजारांचे व्हाल शिकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:00 AM2019-12-23T11:00:55+5:302019-12-23T11:01:19+5:30
ग्रीन टी ही शरीरासाठी फायदेशीर ठरते. यात कोणतीही शंका नाही. ग्रीन टी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅन्टीऑक्सीड्ंटस असतात.
ग्रीन टी ही शरीरासाठी फायदेशीर ठरते. यात कोणतीही शंका नाही. ग्रीन टी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅन्टीऑक्सीड्ंटस असतात. ग्रीन टी शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करते. रोग प्रतिकारक शक्ती वाढविते. ग्रीन टी रोज पिण्यामुळे आपले वजन पण कमी होते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आपले शरीर तंदुरुस्त राहते. ग्रीनचे अनेकविध फायदे असले तरी ग्रीन टी चं सेवन जास्त प्रमाणात केल्यास शरीरासाठी घातक ठरू शकतं.
ग्रीन टी मध्ये टॅनिन्सचे प्रमाण असते त्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. तोंड येणे, पोटात दुखणे यांसारख्या समस्या ग्रीन टी चे सेवन जास्त प्रमाणात केल्यास निर्माण होऊ शकतात.
जर तुमच्या हदयाचे ठोके जास्त वेगात पडत असतील तर गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी प्यायल्याचे लक्षणं असू शकतं. ग्रीन टी मध्ये कॅफिन मोठया प्रमाणात असतं त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. ग्रीन टी मध्ये काही प्रमाणामध्ये टॅनिन्स आहेत. यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामधील लोह शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे जेवण झाल्यानंतर त्वरित ग्री टी न पिता साधारण तासाभराने याचे सेवन करावे.
ग्रीन टी चे सेवन अधिक असेल तर यामुळे दात पिवळे दिसायला लागतात. त्यामुळे दातांची निगा राखणेही तितकेच आवश्यक आहे. जर तुम्ही ‘कॅफिन सेन्सिटिव्ह’ असाल. तर ग्रीन टी च्या अतिसेवनामुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
ग्रीन टी ताण-तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण जर गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी चे सेवन केल्याने मानसिक चिंता आणि तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं म्हणून ग्रीन टी चे सेवन करत असाल तर ते योग्य प्रमाणात करण फायदेशीर ठरेल. अन्यथा आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.