लसणाने ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या होते का? वाचा काय सांगतात एक्सपर्ट्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:29 AM2020-02-11T11:29:36+5:302020-02-11T11:34:33+5:30

हाय ब्लड प्रेशर ही अलिकडे वाढलेली सर्वात मोठी गंभीर समस्या मानली जाते. कारण यानेच वेगवेगळे गंभीर आजारही उद्भवतात.

Know does garlic raise your blood pressure? | लसणाने ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या होते का? वाचा काय सांगतात एक्सपर्ट्स...

लसणाने ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या होते का? वाचा काय सांगतात एक्सपर्ट्स...

googlenewsNext

(Image Credit : medindia.net)

हाय ब्लड प्रेशर ही अलिकडे वाढलेली सर्वात मोठी गंभीर समस्या मानली जाते. कारण यानेच वेगवेगळे गंभीर आजारही उद्भवतात. 'कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया' च्या एक रिपोर्टनुसार, भारतात प्रत्येक ५ पैकी १ तरूण हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनचा शिकार आहे. हेच कारण आहे की, कमी वयातच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या केसेस वाढल्या आहेत. 

हाय ब्लड प्रेशरची वाढती समस्या बघता त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या शरीरातून वाहत असलेल्या रक्ताने धमण्यांवर टाकल्या जाणाऱ्या दाबाला ब्लड प्रेशर म्हटलं जातं. हा आजार कोणत्याही वयात कोणत्याही व्यक्तीला शिकार करू शकतो. त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे आहे. 

अनेक आजारांचं कारण लसूण

ब्लड प्रेशर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतं. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयरोग, डायबिटीस, ब्रेन हॅमरेजसारख्या गंभीर समस्याही होऊ शकतात. योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं. यात सर्वात महत्वाची गोष्ट ठरते की, आहारात आपण लसणाचं सेवन करावं की नाही. काही लोकांना लसूण सेवन करणं अधिक पसंत असतं. पण लसणाने ब्लड प्रेशर वाढू शकतं का? असा प्रश्नही समोर येतो. याचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे. चला तर जाणून घेऊ याचं उत्तर...

काही रिसर्चमधून समोर आले आहे की, लसणात नैसर्गिक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट गुणांमुळे आपल्याला इम्यूनिटी वाढवण्यास मदत मिळते. तसेच याने हृदयरोग टाळण्यासही मदत होते. त्यासोबतच पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्याही लसणाने दूर होऊ शकतात. त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे लसणामध्ये ब्लड प्रेशर कमी करण्याची क्षमताही आहे. 

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी खा लसूण

(Image Credit : healthline.com)

लसणाचं नियमित सेवन केल्याने आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते आणि हाय ब्लड प्रेशरचा धोकाही कमी होतो. पण याचा वापर हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी औषध म्हणून करू नका. कारण लसणाचं अधिक सेवन केल्याने हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक, किडनी फेल्युअरसारख्या समस्या होऊ शकतात. अनियंत्रित ब्लड प्रेशरला स्मरणशक्तीची कमतरता याच्याशीही जोडलं जातं.

लसणातील एंजाइम

लसणात असलेल्या एंजाइम एलिनेज ऑक्सिजन, उष्णता आणि पाण्याव्दारे सक्रिय होतं. हेच कारण आहे की, लसणाला आधीच फ्राय केलं जातं किंवा शिजवलं जातं. म्हणजे गंधहिन सप्लीमेंटचा वापर केला जातो. कच्चा लसूण हा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. पण याचं सेवन योग्य प्रमाणात करावं. अधिक सेवन कराल तर समस्या वाढू शकतात.


Web Title: Know does garlic raise your blood pressure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.