रोज 8 ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं का?; जाणून घ्या सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 12:32 PM2019-09-03T12:32:56+5:302019-09-03T12:33:37+5:30
पाणी म्हणजे जीवन असं आपण नेहमीच ऐकतो. तसेच अनेकदा आपल्याला दररोज 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे बॉडी हायड्रेट होते आणि शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांचाही सामना करावा लागत नाही.
पाणी म्हणजे जीवन असं आपण नेहमीच ऐकतो. तसेच अनेकदा आपल्याला दररोज 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे बॉडी हायड्रेट होते आणि शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांचाही सामना करावा लागत नाही. परंतु, खरचं आपल्याला दिवसभरामध्ये आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे? जाणून घेऊया नक्की सत्य काय आहे?
कोणी सांगितली 8 ग्लास पाण्याची थेअरी?
1945मध्ये अमेरिकेमध्ये फूड अॅन्ड न्यूट्रिशन बोर्ड द्वारे लोकांना दररोज जवळपास 2.5 लीटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही गोष्ट आतापर्यंत सर्चजण फॉलो करत आहेत. फक्त यूएस नाहीतर संपूर्ण जगभरात ही गोष्ट फॉलो केली जाते.
या गोष्टींकडे झालं दुर्लक्षं...
अनेक लोकांना ही गोष्ट माहीत नाही की, या लोकप्रिय आयडियासोबत आणखी एक गोष्ट हायलाइट करण्यात आली होती. ती म्हणजे, व्यक्तीला 2.5 लीटर लिक्विड इनटेक घेणं आवश्यक आहे. परंतु, आपल्या डाएटमध्ये सर्वात जास्त भाग हा भाज्या, ज्यूस, फळं यांचा असतो.
एवढं पाणी पिणं ठरतं योग्य...
दररोज एखाद्या व्यक्तीला किती पाणी पिणं योग्य ठरतं, हे त्याची लाइफस्टाइव, फूड हॅबिट्स इत्यादिंवर अवलंबून असतं. यानुसार, पाण्याचा इनटेक कमी जास्त करणं आवश्यक असतं.
एक्सरसाइज
अनेक व्यक्ती जास्त वर्कआउट किंवा एक्सरसाइज करतात. त्यांच्यासाठी दररोज 2.5 लीटर पाणी पुरेसं नसतं. कारण अॅक्टिव्हिटीमुळे जास्त घाम येतो आणि शरीराची हायड्रेशन लेव्हल कमी होते. त्यामुळे एक्सरसाइज न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत जास्त पाणी पिणं आवश्यक असतं.
उष्ण आणि दमट वातावरणात राहणाऱ्या व्यक्ती
उष्ण किंवा दमट वातवरणात राहणाऱ्या व्यक्तींसाठी दररोज 8 ग्लास पाणी पिणं पुरेसं नसतं. कारण या वातावरणात त्यांचं शरीर वेगाने डिहायड्रेट होतं. याच कारणामुळे त्यांना ज्यूस, साधं पाणी, फ्रुट्स इत्यादी पदार्थांच्या मदतीने जास्त लिक्विड इनटेक घेणं गरजेचं असतं.
गरोदरपणा
गरोदरपणात महिलांना इतर लोकांच्या तुलनेत लिक्विड इनटेक जास्त घेण्याचा सल्ला देण्यात येतो. हा सल्ला डॉक्टर त्यांच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या वाढिनुसार देतात. तसेच गरोदरपणात पाणी किती प्यावं? याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं.
आहारावर असतं अवलंबून
जर तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करत असाल, ज्यामध्ये फळं, ज्यूस आणि भाज्या मुबलक प्रमाणात असतं. तर साध्या पाण्याचे 8 ग्लास तुमच्यासाठी आवश्यक नाही. कारण तुम्ही फॉलो करत असलेल्या डाएटमुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून येण्यास मदत होते.
(टिप : वरील सर्व समस्या या केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)