कमी खाण्याची सवय वाढवू शकते तुमचा एकटेपणा, जाणून घ्या रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 12:06 PM2019-12-25T12:06:55+5:302019-12-25T12:10:19+5:30
सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात.
सणासुधीच्या काळात सर्वसाधारणपणे मिठाई आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सगळ्यांच्याच घरी तयार होत असतात. पण असं असून सुद्धा काही लोक कमी किंवा मोजकंच खातात, असे लोक एकटेपणाचा सामना करत असतात असा धक्कादायक रिसर्च समोर आला आहे. असे व्यक्ती स्वतःला आवडत असलेले पदार्थ खाण्यासाठी सुध्दा विचार करतात.
अमेरिकेच्या कॉर्नेल यूनिवर्सिटीमधील प्रोफेसर केटलिन वूली यांच्यामते एकटेपणा लहान मुलं आणि मोठी माणसं अशा सगळ्या वयोगटात येत असतो. त्यांनी असे सांगितले कि डाएट प्लॅन फॉलो करणारे लोकं हे कुठेही बाहेर पार्टीसाठी अथवा जेवायला गेले तर ते लोक फक्त शारीरीकदृष्या त्याठिकाणी उपस्थीत असतात. पण जेवताना ते इतर लोकांशी फारचं बॉंडिंग तयार करु शकत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यात तेच असतं कि ते किती कॅलरिज् कंज्यूम करत आहेत.
वूली यांच्या अभ्यासानुसार डाएट प्लॅननुसार आहार घेत असलेल्या तसंच कमी जेवत असलेल्या लोकांमध्ये एकटेपणा अधिक प्रमाणात जाणवत असतो. यात अविवाहीत महिला तसंच लहान मुलांचे प्रमाण सुद्दा अधिक होते. तसंच त्या लोकांमध्ये आपण जरा जास्त आहार घेतला तर जाड होणार नाही ना या गोष्टीची भीती मोठ्या प्रमाणावर असते. तसंच असे लोकं आपल्या हेल्थबद्दल खूप जागरूक असतात. त्यांची शारीरीक अवस्थता चांगली राहते. पण एकटेपणा वाढल्यामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परीणाम घडून येत असतो.
वूली यांच्यामते अशा भावना लहान मुलांमध्ये असतात पण त्याचे प्रमाण कमी असते कारण त्यांचे वय लहान असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार लहान मुलं करत नाहीत. आपलं जेवण तसंच खाण्यापिण्याच्या सवयींबाबत लहान मुलं निश्चिंत असतात. काही खास गोष्टी खाण्याचं बंद केल्यामुळे एकटेपणा जाणवतो. १९ टक्के लोकांमध्ये कमी खाण्यामुळे एकटेपणाचा भावना येते. या रिसर्च रिर्पोटला जर्नल ऑफ पर्सनैलिटी एंड सोशल साइकोलॉजी या पुस्तकात छापण्यात आलं आहे.