लहान बाळही होतात हीट स्ट्रोकचे शिकार; जाणून घेऊया लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 12:42 PM2019-05-17T12:42:38+5:302019-05-17T12:46:23+5:30

ऋतू कोणताही असो, नवजात बाळाची आणि त्याच्या आईची खास काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. आईपेक्षाही बाळाकडे जराही दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

Know the effects and safety tips of heat stroke in infants | लहान बाळही होतात हीट स्ट्रोकचे शिकार; जाणून घेऊया लक्षणं आणि उपाय

लहान बाळही होतात हीट स्ट्रोकचे शिकार; जाणून घेऊया लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

ऋतू कोणताही असो, नवजात बाळाची आणि त्याच्या आईची खास काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. आईपेक्षाही बाळाकडे जराही दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. नुकतचं जन्मलेलं बाळ आपल्या आयुष्याच्या पहिल्या स्टेजमध्ये असतं. त्याचं शरीर त्यासाठी तयार नसतं. जन्मानंतर त्याला सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ लागतो. त्यांच बायोलॉजिकल सिस्टम अजून विकसित झालेली नसते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या उन्हाच्या झळा त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात. ज्यामुळे नवजात बाळांमध्ये हिट स्ट्रोक पाहायला मिळतो. अशातच आईची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे आईला आपल्या नवजात बाळाचे बदलणारे हावभाव आणि शारीरिक लक्षण यांच्यावर नजर ठेवणं गरजेचं असतं. जाणून घेऊया नवजात बाळांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या हिट स्ट्रोकची लक्षणं आणि त्यावरील उपायांबाबत...

अशी ओळखा हिट स्ट्रोकची लक्षणं :

  • नवजात बाळ फराच लहान असते. ते स्वतः तहान किंवा भूक लागल्याचे सांगू शकत नाही. तसेच त्याला काय पाहिजे हे ओळखणं अत्यंत कठिण असतं. परंतु आईने जर व्यवस्तित लक्ष दिलं तर ती लक्षणं अगदी सहज ओळखता येतात. 
  • बाळाचे ओठ कोरडे पडतात. 
  • शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्याने त्याचं शरीर आक्रसू लागतं 
  • बाळ थकल्यासारखं वाटतं. 
  • बाळाचं बॉडी टेम्प्रेचर 102 डिग्री फेहरनहाइटपेक्षाही कमी होऊ शकतं. तसेच त्याची त्वचा थंड आणि नरम भासू लागेल. 
  • बाळाला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच तो सतत आपले पाय दुमडू शकतो. 

 

जर हिट स्ट्रोकची लक्षणं वाढू लागली तर बाळामध्ये ही गंभीर लक्षणं दिसू लागतात :

  • 103 डिग्री फारेनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त ताप येणं
  • स्किनवर आचानक लाल चट्टे येतात. 
  • बाळाच्या हृदयाचे ठोके वेगाने पडतात. 
  • बाळाला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो, तसेच अस्वस्थ होतं. 
  • सतत उलट्या होतात

 

जर बाळाला हिट स्ट्रोक झालं तर काय कराल :

बाळ जर सहा महिने किंवा त्यापेक्षा लहान असेल तर त्याला लगेच फिड करण्यास सुरुवात करा. पण बाळ जर सहा महिन्यांपेक्षा मोठं असेल तर त्याला लिंबू, मीठ आणि साखरेचं पाणी पाजण्यास सुरुवात करा. 

लवकरात लवकर बाळाचा ताप कमी करण्यासाठी त्याला थंड आणि मोकळ्या जागेवर घेऊन जा. जर बाळाला ताप आला असेल आणि घरीच असाल तर त्याचे कपडे काढून टाका. घरातील वातावरण थंड ठेवा किंवा बाळाचं शरीर थंड पाण्यामध्ये कॉटनचा कपड बुडवून त्याने पुसून घ्या. जर बाळाला हिट स्ट्रोक झाला असेल तर त्याला मांडीवर ठेवा किंवा अंथरूणावर ठेवा. कार सीट, पाळणा, बेबी केयरमध्ये अजिबात ठेवू नका. 

लक्षात ठेवा बाळाला हिट स्ट्रोकपासून दूर ठेवणं हाच योग्य उपाय आहे. हिट स्ट्रोकची लक्षणं वेळीच लक्षात येणंही अवघड आहे. परंतु बाळाची  काळजी घेऊन लक्षणं वेळीच लक्षात घेणंही गरजेचं आहे. त्यामुळे योग्य वेळी उपचार करणं शक्य होतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Know the effects and safety tips of heat stroke in infants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.