Trigeminal Neuralgia चेहऱ्याला वेदना देणारा एक दुर्मीळ आजार, सलमान खानही आहे याने पीडित...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 10:13 AM2019-12-12T10:13:37+5:302019-12-12T10:13:46+5:30
बिग बॉसमधील स्पर्धकांवर नेहमीच चिडत होता. हे त्याच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला हा शो सोडण्याचा सल्ला दिला.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'दबंग ३' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सोबतच तो टीव्हीवरील 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचं देखील अॅंकरिंग करतो. पण आता त्याने हा शो सोडला असल्याचं बोललं जात आहे. हा शो त्याने का सोडला याबाबत वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. त्यातील एक कारण त्याचा आजार असं सांगितलं जात आहे.
संतापल्यावर नसांमध्ये होते समस्या
(Image Credit : rdhmag.com)
मीडिया रिपोर्ट्नुसार, सलमान खान याला २००१ पासून ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया या दुर्मिळ आजाराने पीडित होता. आता तो या आजारातून बाहेर पडला असला तरी त्याला जास्त चिडचिड करता येत नाही. कारण संपातला किंवा चिडचिड केली तर त्याच्या नसांमध्ये समस्या होऊ शकते.
बिग बॉसमधील स्पर्धकांवर नेहमीच चिडत होता. हे त्याच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला हा शो सोडण्याचा सल्ला दिला. या आजारामुळे सलमानचा आवाजही कर्कश होतो. हा आजार फारच दुर्मिळ असून अनेकांना याबाबत काहीच माहीत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या आजाराबाबत सांगणार आहोत.
चेहऱ्याच्या एका भागात करन्ट लागल्यासारखं वाटतं
ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया नर्व्ह डिसऑर्डर म्हणजे नसांशी संबंधित आजार आहे. आणि हा आजार जगातल्या सर्वात जास्त त्रासदायक आजारांपैकी एक आहे. या आजारात चेहऱ्याच्या एखाद्या भागावर चाकू मारणे किंवा विजेचा झटका लागल्यासारख्या वेदना होता. या वेदना ट्रायजेमिनल नावाच्या नसांमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे होतो. हेच कारण आहे की, चेहरा, डोळे, सायनस आणि तोंडात होणारी कोणत्याही प्रकारची जाणीव, स्पर्श आणि वेदना मेंदूपर्यंत जाते.
काय आहेत या आजाराची लक्षणे?
- ब्रश केल्यावर संपूर्ण चेहऱ्यावर जोरदार वेदना होणे
- चेहऱ्याला स्पर्श केल्यावर वेदना होणे
(Image Credit : healthline.com)
- शेव्हिंग करणे किंवा चेहऱ्यावर मेकअप करताना वेदना होणे
- खाता-पिताना वेदना होणे
- बोलणे किंवा हसल्यावर चेहऱ्यावर वेदना होणे
कोणत्या वयात अधिक होतो हा आजार?
(Image Credit : belmarrahealth.com)
या आजारात सुरुवातीला पीडित व्यक्तीला हलक्या वेदना आणि माइल्ड अटॅक जाणवतात. पण जसजसं वय वाढू लागतं, वेदना अधिक जोरात आणि जास्त वेळ होऊ लागतात. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जिया नावाचा हा आजार तसा कोणत्याही वयात होऊ शकतो. पण पुरूषांच्या तुलनेत महिलांना हा आजार जास्त होतो आणि ज्यांचं वय ५० पेक्षा अधिक असतं त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.
काय आहे उपाय?
जास्तीत जास्त केसेसमध्ये रूग्णांना ही समस्या दातांशी संबंधित वाटते. पण मुळात यात संपूर्ण चेहऱ्यावर वेदना होते. चेहऱ्याच्या एका भागावर काही सेकंद किंवा मिनिटांसाठी जोरात वेदना होतात. जर तापमानात फार बदल झाला जसे की, फार जास्त गरमी असेल किंवा जास्त थंडी असेल तर वेदना असह्य होतात. औषधे आणि इंजेक्शनच्या माध्यमातून नसांवर पडणारं प्रेशर कमी केलं जाऊ शकतं. तसेच यावर उपचारासाठी सर्जरी देखील केली जाते.