आपल्या बाळाच्या सौम्य त्वचेसाठी सर्वोत्तम काय?... कशी कराल निवड?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 04:59 PM2019-12-17T16:59:43+5:302019-12-17T17:12:20+5:30
मसाज करण्यासाठी घट्ट तेलाऐवजी हलकं तेल वापरण्याची शिफारस आम्ही करतो.
आपल्या बाळाच्या सौम्य त्वचेची काळजी कशी घ्यायची, त्याच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य, यासंबंधी पालकांच्या मनात अनेक शंका असतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरं 'जॉन्सन्स जेंटल स्पर्श' या कार्यक्रमात तज्ज्ञांनी दिली.
* माझ्या बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित असतील अशा उत्पादनांसाठी मी कोणता ब्रँड निवडू? - रिटा बन्सल, इटावा
>> बाळासाठी कुठलंही उत्पादन निवडताना ते बाळाच्या सौम्य त्वचेचा विचार करूनच तयार करण्यात आलंय ना याची खातरजमा करून घेण्याची विनंती आम्ही तुम्हाला करतो. अशा उत्पादनांमध्ये हानीकारक रसायनं नसतात आणि डॉक्टरांच्या विश्वासासही ती पात्र ठरलेली असतात. जॉन्सन बेबी केअरच्या सर्व उत्पादनांनी गेल्या १२५ वर्षांपासून लक्षावधी मातांचा आणि डॉक्टरांचा विश्वास जिंकला आहे, हे सांगताना आनंद वाटतो. ही उत्पादनं अपायकारक रसायनांपासून पूर्णपणे मुक्त आहेत. त्यामुळे बाळाची हळुवार काळजी घेत ती त्यांना सदृढ बनवतील.
* बाळासाठी मी कुठल्या प्रकारचं मसाज ऑईल निवडावं? - संगीता जैन, रायबरेली
>> बाळाच्या सौम्य त्वचेचा विचार करता, त्याला मसाज करण्यासाठी घट्ट तेलाऐवजी हलकं तेल वापरण्याची शिफारस आम्ही करतो. घट्ट तेल बाळाच्या त्वचेसाठी अपायकारक ठरू शकतं. हे तेल धुतल्यानंतरही संपूर्णपणे निघून जात नाही. ते त्वचेला चिकटून राहतं. त्यामुळे कालांतराने बाळांच्या त्वचेवर पुरळ किंवा लाल चट्टे येऊ शकतात. बाळाच्या त्वचेवर सहज पसरेल आणि त्वचेला चिकटणार नाही, असं तेल निवडणं उत्तम. जॉन्सन्स बेबी ऑईल 'व्हिटॅमिन ई'ने परिपूर्ण असून बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
* बाळाच्या त्वचेच्या काळजीसाठी पावडर फायदेशीर ठरू शकते का आणि कशी? - श्रद्धा वर्मा
>> मोठ्यांच्या त्वचेच्या तुलनेत लहान मुलांची त्वचा अत्यंत नाजूक, संवेदनशील असते. स्वाभाविकच, तिच्या जपणुकीसाठी अधिकची काळजी घेणं आवश्यक असतं. यात पावडर महत्त्वाची भूमिका बजावते आणि बाळांना ताजंतवानं ठेवते. जॉन्सन्स बेबी पावडरमध्ये IFRA प्रमाणित गंध वापरला आहे. त्यामुळे आपलं बाळ दिवसभर ड्राय, फ्रेश आणि आनंदी राहावं यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
* बाळाच्या सौम्य त्वचेला कुठलाही अपाय होणार नाही, यादृष्टीने कोणता साबण वापरणं फायदेशीर ठरेल? - पारुल द्विवेदी, रायबरेली
>> बाळाची नाजूक आणि सौम्य त्वचा स्वच्छ ठेवण्याचं काम फक्त पाण्याने होऊ शकत नाही. त्वचेवरचं तेल आणि मळ काढण्यासाठी अधिकची आणि विश्वासपात्र गोष्ट लागतेच. साबण, त्यातही बाळांच्या त्वचेचा विचार करून बनवण्यात आलेला बेबी सोप हे काम करू शकतो. आपल्या बाळाला आरोग्यदायी आणि अॅलर्जीपासून दूर ठेवू शकतो. या सगळ्या अपेक्षा जॉन्सन्स बेबी सोप पूर्ण करतो. बाळाच्या सौम्य त्वचेचा विचार करूनच हा साबण तयार करण्यात आला आहे. त्यातील 'व्हिटॅमिन -ई' बाळाच्या सुदृढतेसाठी लाभदायक आहे.
* जॉन्सन्स बेबी प्रॉडक्ट्सच वापरणं का महत्त्वाचं आहे? त्यात असं काही विशेष आहे? - श्रेया दीक्षित, लखीमपूर
सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे, जॉन्सन्स बेबी उत्पादनांमध्ये कुठल्याही हानीकारक रसायनाचा वापर केला जात नाही. ही उत्पादनं शंभर टक्के सुरक्षित आहेत. ती आपल्या बाळाच्या त्वचेची हळुवार काळजी घेतात. गेल्या १२५ वर्षांपासून जगभरातील लाखो मातांनी जॉन्सन्स बेबी प्रॉडक्ट्सवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. कंपनीच्या सर्व उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवर १२ महिने काटेकोरपणे विविध चाचण्या केल्या जातात. जॉन्सन्स बेबीची उत्पादनं जगातील ५.५ लाख लोकांवर तपासून पाहिली गेली आहेत. सर्व उत्पादनं वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आणि सौम्य आहेत. जॉन्सन्स बेबी प्रॉडक्ट्स आपल्या बाळांसाठी वापरून असंख्य पालकांनी त्यावर विश्वास व्यक्त केला आहे, यापेक्षा आणखी मोठं प्रमाणपत्र काय असू शकतं. नाही का?