सावधान! तुम्हालासुद्धा दिसत असतील 'अशी' लक्षणं तर, ४ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 11:09 AM2020-04-27T11:09:44+5:302020-04-27T11:11:34+5:30

कॅन्सरचे उपचार योग्यवेळी केले तर तुम्ही या आजारावर मात करू शकता.

Know four types of cancer, know the symptoms myb | सावधान! तुम्हालासुद्धा दिसत असतील 'अशी' लक्षणं तर, ४ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका

सावधान! तुम्हालासुद्धा दिसत असतील 'अशी' लक्षणं तर, ४ प्रकारच्या कॅन्सरचा असू शकतो धोका

googlenewsNext

कॅन्सरचा आजार हा जीवघेणा ठरत असला तरी तो वेगवेगळ्या माध्यामातून शरीरावर अटॅक करत असतो. कॅन्सरचा आजार शेवटच्या स्टेजमध्ये न जाता सुरूवातीला लक्षणांच्या आधारे तपासणीत दिसून आल्यास तुम्ही त्यावर मात करू शकता. अनेकांना वाटतं कॅन्सर एकच किंवा दोनच प्रकारचे असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॅन्सरचे  काही प्रकार सांगणार आहोत. जे प्रामुख्याने बघायला मिळतात.

कॅन्सरचे १०० पेक्षा जास्त प्रकार आहेत. कॅन्सरचे उपचार योग्यवेळी केले तर तुम्ही या आजारावर मात करू शकता. आज आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या प्रकारांबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही  लक्षणांना ओळखून वेळेवर योग्य उपचार घेऊ शकता. 

ब्रेस्ट कॅन्सर

आजकाल सर्वाधिक महिला या ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार असलेल्या दिसून येतात. या कॅन्सरचे उपचार सोप्या पद्धतीने आणि जलद गतीने केले जाऊ शकतात. पण लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर गंभीर समस्या निर्माण होते.  प्रत्येक ८ महिलांमध्ये एका महिलेला या प्रकारच्या कॅन्सरचा धोका असतो. एका रिपोर्टनुसार २०१८ मध्ये कॅन्सरच्या १ लाख ६२ हजार ४६८ केसेस समोर आल्या ज्यामध्ये ८७ हजार ९० महिलांचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सरमुळे झाला होता.

अनियमीत जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त उद्भवतो. या आजारात महिलांच्या छातीत गाठ तयार होते. त्यातून द्रव पदार्थ बाहेर निघत असतो. छातीत असहय्य वेदना होतात. जर वेळीच लक्ष दिलं नाही तर कॅन्सरमुळे जीव जाण्याची शक्यता  असते. पहिल्या स्टेजमध्ये हा आजार बरा होण्याची शक्यता ८० टक्के असते,  नंतरच्या स्टेजला ६० टक्के शक्यता असते. चौथ्या स्टेजला हा कॅन्सर असेल तर रुग्ण बरा होण्याची शक्यता नसते. 

प्रोस्टेट कॅन्सर

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते. वयाची पासष्टी ओलांडलेल्या दर शंभर जणांमध्ये किमान २२ जणांना प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता असते.

फुप्फुसांचा कॅन्सर

कॅन्सरमध्ये व्यक्तीची फुप्फुसं वेगाने खराब होऊ लागतात. यात श्वास घेण्यास अडचण होणे, सतत कफची समस्या होणे, हाडे आणि जॉइंट्समध्ये वेदना होणे अशा समस्या होतात. जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. कॅन्सरचा हा प्रकार कधी प्रदूषण आणि स्मोकिंगमुळे अधिक पसरतो. ( हे पण वाचा-कोरोनाच्या माहामारीत आशेचा किरण दाखवणार 'सेप्सिवॅक'? जाणून घ्या औषधाबद्दल)

त्वचेचा कॅन्सर

सध्या स्कीन कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढत आहे.  तज्ञांच्यामते, हा कॅन्सर उन्हात जास्त वेळ राहिल्याने, योग्य डाएट न घेतल्याने आणि शारीरीक हालचाल न करण्यासारख्या स्थितींमध्ये होतो. हा कॅन्सर कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला शिकार करू शकतो. मुख्यत: केसांची त्वचा,चेहरा,ओठ,कान,मान,छाती,हात व विशेषत: महिलांचे पाय या अवयवांच्या त्वचेवर हा विकार होण्याची शक्यता अधिक असते. ( हे पण वाचा-रोजच्या चुकीच्या सवयींमुळे 'या' गंभीर समस्यांचे होत आहात शिकार, जाणून घ्या कसे)

Web Title: Know four types of cancer, know the symptoms myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.