वर्क फ्रॉम होम करत असाल तर न विसरता खा दोन केळी, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:11 AM2020-04-01T10:11:04+5:302020-04-01T10:18:20+5:30
कितीही नाही म्हटलं तरी ऑफिसमधून काम करणं आणि घरात बसून काम करणं यात फरक आहेच. घरात काम करताना कंटाळा अधिक येतो.
कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन करण्यात आलं असून जवळपास सर्वच ऑफिसेस बंद आहेत. अशात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. कितीही नाही म्हटलं तरी ऑफिसमधून काम करणं आणि घरात बसून काम करणं यात फरक आहेच. घरात काम करताना कंटाळा अधिक येतो आणि एनर्जीची सुद्धा गरज अधिक असते. काम करण्यासाठी अधिक एनर्जी मिळवण्यासाठी नाश्त्यात किंवा जेवणानंतर केळीचा आहारात समावेश करू शकता. लॉकडाऊनमध्येही केळी तुम्हाला सहजपणे कुठेही मिळू शकेल.
केळी खाल्ल्याने तुम्हाला वेगवेगळे फायदे होऊ शकतात. तसेच वर्क फ्रॉम करत असताना केळी खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळेल. ज्यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी एनर्जी मिळेल.
अॅग्रीकल्चर सर्व्हिसनुसार, एका केळ्यात 89 किलो कॅलरींची एनर्जी असते. तसेच यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडियम, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन ई सारखे भरपूर तत्व असतात. या तत्वांमुळे तुमच्या शरीराला पोषण मिळतं आणि यांनीच एनर्जी मिळते.
तेच केळ्यातील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई हे तत्व आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. त्यामुळे तुमची काम करण्याची क्षमताही वाढेल. वर्क फ्रॉम होम करताना तुमचं कामात लक्ष लागेल आणि कामाचा कंटाळा देखील येणार नाही.
केळीने शरीराला होणाऱ्या इतर फायद्यांबाबत सांगायचं तर केळीचं सेवन त्वचेसाठीही फायदेशीर असतं. कारण यात मॅग्नीजचं प्रमाण भरपूर असतं. तर व्हिटॅमिन सी अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रूपात त्वचेला उजळवण्याचं काम करतं. तसेच लोकांना जर हृदयासंबंधी काही समस्या असेल तर केळ्यातील पोटॅशिअमचा फायदा नक्कीच होईल.
केळ्याची तुम्ही स्मूदी तयार करू शकता किंवा सामान्य रूपातही खाऊ शकता. याचे फायदे तुम्हाला कोणत्याही रूपात मिळतात. तुम्हाला जर एनर्जी हवी असेल तर तुम्ही केळी खाऊ शकता.