मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 11:10 AM2018-04-18T11:10:59+5:302018-04-18T11:10:59+5:30

मातीच्या मडक्यातील पाणी शरीरातील टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढवतात आणि अॅसिडीटीसारखी समस्याही दूर होते. चला जाणून घेऊया मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे खास फायदे...

Know the health benefits of drinking water from the Matka or earthen pot | मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

googlenewsNext

उन्हाळा लागला की, अनेकजण मातीच्या मडक्यातील थंड पाणी पितात. आजपर्यंत तुम्ही मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. पण खरंच त्याचे काय फायदे होतात. हे अनेकांना माहिती नसतं. मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. मातीच्या मडक्यातील पाणी शरीरातील टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढवतात आणि अॅसिडीटीसारखी समस्याही दूर होते. चला जाणून घेऊया मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे खास फायदे...

विषारी पदार्थ शोषून घेण्याची क्षमता

मातीत अशुद्ध गोष्टींना शुद्ध करण्याचे गुण असतात. त्यामुळे माती पाण्यातील सर्वच विषारी पदार्थांचं शोषण करते. यासोबतच माती पाण्यात असलेल्या सर्वच सूक्ष्म पोषक तत्वांना एकत्र करण्याचं काम करते. त्यामुळे पाण्याचं तापमान संतुलित राहतं. म्हणजे पाणी ना जास्त थंड होत, ना जास्त गरम...

टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढतो

पुरुष आणि महिला या दोघांच्याही शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स असतात. नियमीतपणे मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरुन ठेवल्याने प्लॅस्टिकमधील अशुद्ध गोष्टी एकत्र होतात. त्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. महत्वाची बाब म्हणजे मातीच्या मडक्यात पाणी साठवून ठेवल्याने आणि ते प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोन्समध्ये वाढ होते.

घसा चांगला राहतो

उन्हाळ्यात फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने घसा आणि शरीरावर मोठा प्रभाव पडतो. थंड पाणी प्यायल्याने घशातील पेशींचे तापमान कमी होते आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. थंड पाणी प्यायल्याने घशातील ग्रंथींवर सूज येते. पण मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने असे काही होत नाही. 

पोट चांगलं राहतं

बर्फाचं पाणी किंवा फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेकांना पोटात दुखायला लागतं. घसाही यामळे खराब होतो. वाताचा त्रासही व्हायला लागतो. पण मातीच्या मडक्यातील पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही. मडक्याला रंग देण्यासाठी गेरुचा वापर केला जातो. गेरु उन्हाळ्यात थंडावा देण्याचं काम करतो. 

Web Title: Know the health benefits of drinking water from the Matka or earthen pot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.