शरीर डिटॉक्स करण्याासाठी 'हा' सोपा उपाय वापराल; तर नेहमी आजारांपासून दूर राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 04:05 PM2020-06-12T16:05:36+5:302020-06-12T16:10:02+5:30

उपवासात आपण शरीरातील उर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान शरीरात होणारे बदल मृत पेशींचे इम्यून सेल्स रिसायकल होण्यास कारणीभूत ठरतात.

Know the health benefits of fastingand for weightloss | शरीर डिटॉक्स करण्याासाठी 'हा' सोपा उपाय वापराल; तर नेहमी आजारांपासून दूर राहाल

शरीर डिटॉक्स करण्याासाठी 'हा' सोपा उपाय वापराल; तर नेहमी आजारांपासून दूर राहाल

Next

दिवसभरात आपण जे जे पदार्थ खातो. त्यातील काही घटकांचे रुपांतर टॉक्सिन्समध्ये होते. उपाशी राहिल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यास कशी मदत होईल याबाबत आज सांगणार आहोत. जेव्हा आपण उपाशी राहतो तेव्हा शरीरात जमा झालेल्या ग्लुकोजचा वापर करण्यासाठी २४ ते ४८ तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर शरीरात फॅट्स बर्न व्हायला सुरूवात होते. नंतर किटोन बॉडीज तयार होतात. 

NBT

आपण जेव्हा काही खायला सुरवात करतो तेव्हा इन्सुलिनचा वापर व्हायला सुरूवात होते आणि जास्तीचे इन्सुलिन तयार व्हायला लागते. थोडक्यात जेवणानंतर अन्न पचनाच्यावेळी आलेल्या अन्नघटकांनुसार त्यांचे विघटन होते. कार्बचे साखरेत रुपांतर होते, इन्सुलिन सोबत ती रक्तात मिसळून लागणार्‍या सर्व पेशींना पोहचवली जाते. जास्तीची साखर अर्थात चरबीच्या रूपात लिव्हर व इतर भागात साठवली जाते.

किटोन बॉडीज शरीरातील एंटीऑक्सिडेशन वाढवतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सिडेशची प्रक्रिया संथगतीने करता येऊ शकते. ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेमुळे शरीरातील प्रोटीन्स आणि सेल मेब्रेनच्या रचनेला नुकसान पोहोचते. शरीरात वाढलेली ऑक्सिडेशनची प्रक्रिया आपल्याला झपाट्याने वृधत्वाकडे नेते. व्हाईट सेल्स संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी लागतो. यावेळेत डॅमेज सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर एनर्जेटिक सेल्स वेगाने निर्माण होता.

NBT  

युनिव्हरसिटी ऑफ कॅलिफोर्नियाद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार एखादी व्यक्ती लागोपाठ  तीन दिवस उपवास ठेवून उपाशी राहत असेल. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कारण उपवासात आपण शरीरातील उर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान शरीरात होणारे बदल मृत पेशींचे इम्यून सेल्स रिसायकल होण्यास कारणीभूत ठरतात.

NBT

हे फास्टींग करत असाताना रात्रीचे जेवण जेवायला ज्यांना उशीर होतो त्यांनी सकाळी नाश्ता वेळेवर घ्यायचा. दुपारचे जेवण घ्यायचे व रात्रीचे जेवण घेणे बंद करायचं.  सुरूवातीला डोकेदुखी, पित्त हे जाणवू शकते. त्यासाठी सतत पाणी पित राहणं आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात जेव्हा आपण पहिल्या खाण्याची वेळ पुढे ढकलतो तेव्हा ती वेळ पाळणे महत्वाचे. भूक  लागल्यास पाणी प्यावं, बरेचदा त्यामुळे  भूक कमी होते.

NBT

फास्टींगचे फायदे

फर्ट्स बर्न होण्यास सुरूवात होते. 

आकलन व स्मरणशक्ती वाढते.

डीएनए दुरूस्तीकामाची कार्यक्षमता वाढते.

न्युरॉनसाठी उपयुक्त अशा किटोन बॉडीज तयार होतात.

चिडचिड कमी होते. 

वजन कमी  होते.

गरोदर महिलांनी, बाळाला स्तनपान करणार्‍या महिलांनी, लहान मुलांनी या प्रकारचं फास्टिंग न करणंच उत्तम ठरेल. ह्या फास्टिंग दरम्यान साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे टाईप १ डायबिटीस असलेल्या लोकांनी हे फास्टींग डॉ. मार्गदर्शनाखालीच करावे. तसंच कमी ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनीही हे फास्टींग करताना काळजी घेणे अपेक्षित आहे कारण फास्टींगच्या काळात ब्लडप्रेशर कमी होते. 

कोरोनावर १०० % प्रभावी ठरणार अश्वगंधा आणि गुळवेळ; रामदेव बाबांचा दावा, जाणून घ्या यामागचं कारण

CoronaVirus : आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र; जाणून घ्या खासियत 

Web Title: Know the health benefits of fastingand for weightloss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.