एकदा जर घ्याल पेरूच्या पानांचा ज्यूस तर डॉक्टरकडे जाणं विसराल, फायदे वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 11:16 AM2020-02-21T11:16:10+5:302020-02-21T11:16:17+5:30
पेरू चवीलाच चांगला लागतो असं नाही तर त्याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. इतकेच नाही तर पेरूच्या पानांचा ज्यूसही आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतो.
सध्या पेरूचा सीझन सुरू आहे. पेरू खाण्याचे फायदे तुम्ही घरातील मोठ्यांकडून ऐकले असतीलच. पण तुम्हाला पेरूच्या पानांचं महत्व माहीत आहे का? पेरू इतकेच पेरूच्या पानांचे देखील आपल्या आरोग्याला फायदे होतात. डॉक्टर सुद्धा काही केसेसमध्ये पेरूच्या पानांचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पेरूच्या पानांच्या ज्यूसचे फायदे सांगणार आहोत.
पेरूच्या पानांचा ज्यूस पिण्याचा फायदा सर्वात जास्त डेंग्यूच्या रूग्णांना होतो. त्यासोबत या ज्यूसचे इतरही अनेक फायदे शरीराला मिळतात. म्हणजे हे फायदे इतके चांगले आहेत की, काही वेळा तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज पडणार नाही.
वेगाने वाढतात प्लेटलेट्स
पेरूच्या पानांचा ज्यूस प्यायल्याने प्लेटलेट्स वेगाने वाढतात. कारण या पानांमध्ये किंवा पानांच्या ज्यूसमध्ये मेगाकॅरोपियोसिस वाढणारे औषधी गुण आढळतात. ज्यामुळे प्लेटलेट काउंट वेगाने वाढू लागतो. डेंग्यूच्या रूग्णांना डॉक्टरांकडून हा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.
जखम भरण्यास मदत
पेरूच्या पानांचा ज्यूस एखादी जखम लवकर बरी होण्यासही मदत करतो. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, पेरूच्या पानांमध्ये अॅंटीसेप्टिक गुण असतात. त्याचा एखादी जखम लवकर भरण्यास वापर केला जाऊ शकतो.
मसल्स होतात स्मूद
पेरूच्या पानांचा ज्यूस शरीराच्या मासंपेशी स्मूद होतात. पेरूच्या पानांच्या ज्यूसमध्ये क्युसर्टिन नावाचं पौष्टिक तत्व असतं. ते ज्यूसच्या रूपात सेवन केल्याने आपल्या शरीरातील मांसपेशींना आराम मिळण्यास मदत मिळते.
डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर
वेगवेगळ्या समस्यांसोबतच डायबिटीसच्या रूग्णांना देखील याचा फायदा होतो. पेरूच्या पानांमध्ये अॅंटी-डायबेटिक गुण असतात. त्यामुळे या पानांचा ज्यूस सेवन करू तुम्ही डायबिटीसपासून बचाव करू शकता.
तोंडाची फोडं होतात दूर
ही समस्या पोट व्यवस्थित साफ होत नसल्या कारणानेही होऊ शकते. अशात पेरूच्या पानांचा ज्यूस घ्याल तर तुम्हाला या समस्येपासून आराम मिळेल. अशावेळी तुम्ही दिवसातून दोनदा ज्यूसचं सेवन करू शकता.
पचनक्रिया सुधारण्यास मदत
पेरूच्या पानांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे याच्या ज्यूसचं सेवन कराल तर पचनक्रिया ठिक होण्यासही तुम्हाला मदत मिळेल. तसेच पोटाच्या इतरही समस्या याने दूर होतील.
हृदय राहतं निरोगी
हृदय निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा पेरूच्या पानांच्या ज्यूसचं सेवन करू शकता. याचं कारण म्हणजे पेरूच्या पानांमध्ये कार्डिओप्रोटेक्टिव गुण आढळतात. हा गुण आरोग्यसाठी फायदेशीर मानला जातो.