आरोग्यासाठी घातक ठरत आहे गुड कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण; हृदयविकाराचा असू शकतो धोका, वाचा रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 06:42 PM2020-06-14T18:42:08+5:302020-06-14T18:50:20+5:30

अमेरिकेतील एमोरी युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही इतर गोष्टींप्रमाणे गुड कॉलेस्ट्रॉलंच जास्त प्रमाण असणं गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं. 

know High levels of good cholesterol can increase the risk of heart disease research | आरोग्यासाठी घातक ठरत आहे गुड कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण; हृदयविकाराचा असू शकतो धोका, वाचा रिसर्च

आरोग्यासाठी घातक ठरत आहे गुड कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण; हृदयविकाराचा असू शकतो धोका, वाचा रिसर्च

Next

(image credit nutraingredients-asia)

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक दशकांपासून तज्ज्ञ हाय डेंसिटी लाइपोप्रोटीन (एचडीएल) म्हणजेच गुड कोलोस्ट्रॉलचा स्तर वाढवण्याचा सल्ला देत आहेत. अमेरिकेतील एमोरी युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही इतर गोष्टींप्रमाणे गुड कॉलेस्ट्रॉलंच जास्त प्रमाण असणं गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं. 

तज्ज्ञांच्यामते एचडीएल हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण एचडीएलचे जास्त प्रमाण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. एचडीएलचे प्रमाण वाढवणाऱ्या औषधांमुळे हृदय रोगाने होत असलेल्या मृत्यूचा धोका कमी होत नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. 

लॉरा कॉर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या संशोधनात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर परिक्षण करण्यात आलं होतं. त्यातील १३ टक्के लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ज्या लोकांच्या शरीरात एचडीएलचे प्रमाण १.० पेक्षा कमी किंवा १.४ पेक्षा जास्त होते अशा लोकांच्या मृत्यूचे प्रमाण  जास्त होते. फक्त १.० आणि १.४ यामध्ये एचडीएल असलेल्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका कमी दिसून आला.  शरीरात दोन प्रकारचे कॉलेस्ट्रॉल असतात. 

१.एचडीएल (बॅड कोलेस्ट्रॉल) : शरीरातील धमन्यांच्या भीतींवर एक थर जमा  होतो. त्यामुळे रक्तप्रवाह सुरू असताना धमन्यावर दबाव पडत असतो. जास्त दबाव पडल्याने धमन्या फुटण्याचा धोका असतो. 

-स्रोत : फुल क्रिम दूध, चीज, फास्ट फुड, तेलकट पदार्थ, ब्रेड, नुडल्स, पास्ता, बेकरी उत्पादनं.

२. एचडीएल (गुड कोलेट्रॉल) 

गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी पोषक असते. काही पदार्थांचा समावेश केल्यास हृदयाचं आरोग्य चांगले राहू शकते.  पण या रिसर्चनुसार याचे जास्त प्रमाण हृदयासाठी घातक ठरू शकतं. 

-स्रोत :  मोड आलेली कडधान्ये, फळ भाज्या, ऑलिव्ह ऑईल, बदाम,आळशी, तुळस 

दवाखान्यात जाण्याची वेळ येण्याआधी; 'या' घरगुती उपायांनी फुफ्फुसांना ठेवा संक्रमणापासून लांब

मोठ्या कुटुंबातील लोकांना कोरोनाचा धोका जास्त? जाणून घ्या अफवा आणि फॅक्ट्स

Web Title: know High levels of good cholesterol can increase the risk of heart disease research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.