पोटाच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतय? 'या' उपायांनी लठ्ठपणा करा दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:59 AM2020-02-11T10:59:54+5:302020-02-11T11:15:00+5:30
वजन वाढण्याची समस्या ही सगळ्याच महिलांमध्ये जाणवत असते.
वजन वाढण्याची समस्या ही सगळ्याच महिलांमध्ये जाणवत असते. खासकरून कमरेची आणि पोटाची चरबी वाढत जाते. शरीर बेढब दिसायला सुरूवात होते. पोटाची चरबी वाढल्यामुळे आपल्या लूकवर फरक पडत असतो. त्याबरोबरच अनेक धोकादायक आजार होण्याची शक्यता सुद्धा असते. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाचा सामना करत असतात. फिटनेसकडे पुरेसं लक्ष न दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढत जातात. स्वतःला जर फिट ठेवायचं असेल तर रोज व्यायम करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या आणि काही खास टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपलं वजन कमी करू शकता.
क्रचिंग करा.
तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल तर पोट कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त व्यायाम करावा लागतो. तरच तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. पण सध्याच्या काळात अनेक तास बसून काम केल्यामुळे पोटाची चरबी वाढण्याची समस्या सगळ्यांनाच जाणवत असते. तुम्ही सुद्धा पोटावरच्या चरबीने हैराण असाल तर क्रचिंग करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. सगळ्यात सोपा हा व्यायाम आहे. क्रंचिगनंतर कार्डीओ, एब्सचा व्यायाम करू शकता. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला आपले पाय सरळ ठेवावे लागतील.
विटामिन-सी युक्त आहार घ्या
वजन कमी करणं असो अथवा वाढवणं असो. या स्थितीत तुम्हाला डाएट खूप महत्वाचं असतं. त्यासाठी व्हिटामीन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. पोट कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं असतं. त्यासाठी फळं, ताज्या भाज्या, गरम पाणी, लिंबू यांचा आहारात समावेश करा.
झोप पूर्ण करणे
रोजच्या कामामुळे वेळेचा अभाव आणि थकवा आल्यामुळे आपली झोप पुर्ण होत नाही. ७ ते ८ तास झोप घेणं गरजेचं असतं. जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागे राहत असाल तर तुमचं पोट जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगली झोप घेणं आवश्यक आहे. कारण झोप झाली नाही तर हार्मोनल इंबॅलेन्स होण्याची शक्यता असते. (हे पण वाचा-लघवीची दुर्गंधी 'या' आजारांचं ठरू शकते कारण)
योगा
योगा करणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असतं. रोज पोट कमी करण्यासाठी तुम्ही ठरावीक पद्धतीने योगा कराल कर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. तुम्हाला जीमला जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही. घरच्याघरी मॅट घालून तुम्ही या फोटोत दाखवल्याप्रमाणे स्थितीत बसून योगा करू शकता. ( हे पण वाचा-पेनकिलरच्या सेवनाने होऊ शकतात 'या' गंभीर समस्या, वाचा कोणत्या)