महागड्या टुथपेस्टमुळे नाही तर 'या' ५ गोष्टींमुळे दात होतील चमकदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 10:21 AM2019-12-18T10:21:13+5:302019-12-18T11:28:30+5:30

सुंदर, स्वच्छ पांढरे दात सगळ्यांनाच हवे असतात. पण काही कारणामुळे आपण शरीराची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या उद्भवतात.

Know the home remedies can help you to whiten your teeth | महागड्या टुथपेस्टमुळे नाही तर 'या' ५ गोष्टींमुळे दात होतील चमकदार 

महागड्या टुथपेस्टमुळे नाही तर 'या' ५ गोष्टींमुळे दात होतील चमकदार 

googlenewsNext

सुंदर, स्वच्छ पांढरे दात सगळ्यांनाच हवे असतात. पण काही कारणामुळे आपण शरीराची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या उद्भवतात. चहा कॉफी जास्त प्रमाणात पिणे. तसंच काही खाल्यानंतर लगेच दात स्वच्छ न करणे. यांमुळे दात पिवळे दिसायला लागतात. दात हे आपल्या व्यक्तीमत्त्वातील सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. कारण जेव्हा आपण हसतो, किंवा इतरांशी बोलत असतो तेव्हा आपले दात समोरच्या व्यक्तीला दिसत असतात. जर तुमचे दात पिवळे असतील तर अनेकदा तुम्हाला नकारात्मक कमेंट्सचा सामना करावा  लागतो. तसंच तुमचं इम्प्रेशन सुध्दा चुकीचं पडू शकतं. या समस्यांपासून वाचण्यासाठी आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही महागड्या टुथपेस्ट न वापरता सुध्दा सुंदर आणि पांढरे दात मिळवू शकता.  

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी दातांचा पिवळेपणा दुर करण्यासाठी फायदेशीर ठरते. स्ट्रोबेरीमध्ये असणारे एंजाइम मॅलिक एसिड आणि व्हिटामीन सी तुमच्या दातांवर असणारा पिवळटपणा दूर करते. चमकदार दात मिळवण्यासाठी आठवड्यातून दोनवेळा स्ट्रोबेरी मॅश करून या मिश्रणाने दात घासा. शक्य नसल्यास किमान जास्तीत जास्तवेळा स्ट्रोबेरी चावून खाण्याचा प्रयत्न करा. 

फ्लोसिंग

डॉक्टरांचे असे मत आहे की ब्रश करण्याच्या तुलनेत फ्लोसिंग केल्याने दातांसाठी अधिक फायदेशीर ठरतं. फ्लोसिंग म्हणजेच दात साफ करण्यासाठी असलेला धागा. दातांच्या मधील  पिवळेपणा हटवण्यासाठी फ्लोसिंग गुणकारक ठरतं. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा तरी फ्लोसिंग करायला हवं.

बेकिंग सोडा आणि लिंबू

बेकिंग सोडा व लिंबू हे किचनमध्ये अगदी सर्रास आढळतात. शुभ्र दात मिळवण्यासाठी सोडा व लिंबू परिणामकारक आहे.  बेकिंग सोडा हा खरखरीत असल्याने तो दातांवर स्क्रबर म्हणून काम करतो. तर लिंबात सायट्रिक अ‍ॅसिड असल्याने, लिंबू ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. बेकिंग सोडा हा अल्कलाईन स्वरूपात असल्याने तो लिंबाच्या रसातील अ‍ॅसिडीक क्षमता (आम्लता) कमी करतो व दात शुभ्र करण्यासाठी मदत करतो. यासाठी चमचाभर  बेकिंग सोड्यात, लिंबाचा रस एकत्र करून त्याची घट्ट पेस्ट बनवा, टुथब्रशच्या सहय्याने ही पेस्ट दातांवर लावा. व मिनिटभरासाठी राहू द्या, त्यानंतर नीट चूळ भरा व तोंड स्वच्छ करा. यामुळे दातांमध्ये फरक दिसून येईल.

फळं भाज्या 

तुमच्या दातांना पांढरे शुभ्र बनवण्यासाठी फळं आणि भाज्या मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतात.  तसंच ओवा आणि गाजर तुमच्या दातांसाठी उपयोगी ठरतात. यामुळे दातांवरून बॅक्टेरीया निघून जाण्यास मदत होते. फळांमध्ये असणारे अ‍ॅसिड्स दातांसाठी गुणकारी ठरतात. त्यामुळे कच्ची फळं खाल्याने दात स्वच्छ राहतात.

ऑईल पुलिंग

ऑईल पुलिंगमुळे फक्त दातच नाही तर संपूर्ण शरीर स्वच्छ राहते. दात साफ करण्यासाठी असलेली ही पध्दत काहीही वेगळा खर्च न करता आणि सोप्या पध्दतीने तुम्ही करू शकता. यासाठी एक चमचा ऑर्गेनिक तेल १५ ते २० मिनिटं तोंडात ठेवून  चारही बाजुंना फिरवा तसंच त्यानंतर गुळण्या करा. हे केल्यानंतर २ ते ३  ग्लास पाणी प्या. 

Web Title: Know the home remedies can help you to whiten your teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.