पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस?
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 5, 2021 07:49 PM2021-01-05T19:49:07+5:302021-01-05T19:52:52+5:30
यासंदर्भात बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते.
नवी दिल्ल - देशात कोरोनाविरोधातील लढाईत दोन कोरोना लशींना मंजुरी मिळाल्यानंतर, आता लसीकरणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. देशात पुढील आठवड्यापासून लसिकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा, की ही लस लॅबमधून जवळच्या लसिकरण केंद्रापर्यंत कशी पोहोचेल?
यासंदर्भात बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. कोरोना लशीच्या इमरजन्सी वापरासंदर्भात DCGIने 3 जानेवारीला (रविवार) आपली मंजुरी दिली होती. यानुसार, 13 अथवा 14 जानेवारीपासून देशात कोरोना लसिकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते.
लोकांपर्यंत कशी पोहोचेल लस? -
लस लोकांपर्यंत कशी पोहोचेल? यावर आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले, की लस कॅरियरच्या माध्यमाने कोल्ड चेन प्वाइंट्सने सर्व सेंटर्सपर्यंत (हे जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्र, कम्यूनिटी सेंटर्स असू शकतात.) एक रेफ्रिजिरेटर अथवा इंस्युलेटेड व्हॅनच्या (पॅसिव्ह इक्विपमेन्ट, आईस बॉक्स अथवा टेम्परेचर कंट्रोल्ड आदि) माध्यमाने नियोजित स्थळी पाठवली जाईल.
देशात 4 प्राथमिक व्हॅक्सीन स्टोर्स आहेत -
राजेश भूषण म्हणाले, देशात करनाल, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे 4 प्राथमिक व्हॅक्सीन स्टोर्स आहेत. लॅबमधून लशी GMSD डेपोने या चारही स्टोर्सपर्यंत हवाई मार्गाने पाठवल्या जातील. यानंतर देशातील 37 लस केंद्र आहेत आणि येथेच लशी स्टोअर केल्या जातील. यानंतर, लशी बल्कमध्ये जिल्हा स्तरावर पाठवल्या जातील.
आजच्या घडीला देशात जवळपास 29,000 कोल्ड चेन प्वाइंट्स -
जिल्हा स्तरावरून या लशी प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत फ्रिजर डब्ब्यांच्या सहाय्याने पाठवल्या जातील. येथे ही लस लोकांना टोचली जाईल. तसेच, आजच्या घडीला देशात जवळपास 29,000 कोल्ड चेन प्वाइंट्स आहेत. येथे या लशी सुरक्षितपणे स्टोर करून ठेवल्या जाऊ शकतात, असेही आरोग्य सचिव भूषण यांनी सांगितले.
रुग्ण संख्येत घट -
देशात कोरोनाला आळा घालण्यात यश येत असल्याचेही राजेश भूषण यांनी सांगितले. गेल्या 11 दिवसांत दर दिवसाला 300 हून कमी मृत्यू होत आहेत. देशात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ 1.97 टक्के इतका असून एकूण पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 43.96 टक्के रुग्णांवर रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर 56.04 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.