कमरेचा घेर वाढतोय? फिगर मेन्टेन करायला घरच्याघरी 'असा' करा व्यायाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 01:04 PM2019-12-19T13:04:26+5:302019-12-19T13:06:49+5:30
आजकाल आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी सगळ्या स्त्रिया प्रयत्न करत असतात.
आजकाल आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी सगळ्या स्त्रिया प्रयत्न करत असतात. कारण कामासाठी किंवा ऑफिससाठी बाहेर जाताना प्रत्येकालाच आकर्षक दिसायचं असतं. पण काही कारणामुळे महिलांना आपली फिगर मेन्टेंन करणं शक्य होत नाही. खाण्यापिण्याच्या वेळात असलेली अनियमितता, अपुरी झोप तसंच दैनंदिन आयुष्यात वाढत जाणारा ताणतणाव यांमुळे फिगर मेन्टेन तर नाहीच पण वजन वाढण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे तुम्ही प्रेजेंटेबल दिसू शकत नाही. तसंच कपडे टाईट व्हायला लागतात. जर तुम्हाला जीमला जायला पुरेसा वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुध्दा व्यायाम करुन आपलं वजन नियंत्रणात ठेऊ शकता. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी व्यायाम कसा करायचा.
माउंटन क्लाइम्बर्स वर्कआउट
पुशअप्सच्या पोझिशनपासून सुरुवात करत तुमचा एक पाय हाताजवळ आणा आणि परत तो होता त्या स्थितीत ठेवा. हा प्रकार पुन्हा दुसऱ्या पायासोबतही करा. हा प्रकार शक्य तितक्या वेगात करण्याचा प्रयत्न करा. पुशअप्स पोझिशन म्हणजे दोन्ही हात तळवे जमिनीवर टेकवून आणि पायाच्या चवडय़ांवर आणि या तळहातांवर शरीर तोलून धरणे. तुमची छाती , खांदे आणि हातांच्या मनगटांना बळकटी देण्यासाठी रोज पुशअपस् हा व्यायाम करणं गरजेचं आहे. या व्यायामाच्या प्रकारामुळे श्वासाचे आजार बरे होतात. वजन कमी करायचं असल्यास हा व्यायाम फायदेशीर ठरेल.
स्क्वॅट
पायांच्या मसल्सना मजबूत करण्यासाठी स्क्वॅट हा वर्कआऊट उत्तम ठरतो. यासाठी सगळ्यात आधी सरळ उभं राहा त्यानंतर हात समोर लांब करा. मग खाली बसा , खाली बसताना तुमचे हात समोर असायला हवेत. बसताना तुमच्या मांड्यांवर प्रेशर यायला हवं. यामुळे तुमच्या मागच्या भागाचे तसंच मांड्यांचे फॅट कमी व्हायला सुरूवात होईल.
क्रंचेस
हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर आडवं झोपा. त्यानंतर दोन्ही हातांनी मानेच्या मागच्या डोक्याला पकडून ठेवा. त्यानंतर हळूहळू वर उठण्याचा प्रयत्न करा. पायांना गुडघ्यामध्ये वाकवून आपल्या हाताजवळ आणण्याचा प्रयत्न करा. जर डावा हात पुढे आणत असाल तर उजवा पाय वर येऊ द्या. तसंच उजवा हात पुढे आणतं असाल तर डावा पाय पुढे येऊ द्या. हा व्यायाम केल्यास पोट आत जाण्यास मदत होऊन पोटाची चरबी कमी होईल. तसंच मनगट आणि मसल्स मजबूत होतील.